मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. तर अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाच्या सहकार व पणन विभागाच्या वतीने
राज्यातील जवळपास ३ हजार १८८ अ वर्गातील तर २८५ ब वर्गातील सहकारी संस्थाच्या निवडणूका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातही काही सहकारी संस्थाच्या निवडणूका सुरु होत्या. मात्र हा आदेश आल्यामुळे तसेच सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे या निवडणूका पुढे ढकलण्यात येणार आहेत.
त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या पतसंस्था क्रमांक २ ची ही निवडणूक आता पुढे ढकलण्यात येणार आहे.
तर बार्शी बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम सुरु असून बाजार समितीची प्रारुप मतदार यादी नुकतीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिध्द केली आहे.
त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. तोपर्यंत हा आदेश आला आहे. त्यामुळे बार्शी बाजार समितीची निवडणूक थांबणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
हा आदेश सहकारी संस्थांसाठी, बाजार समितीसाठी नाही
सहकारी संस्थाच्या निवडणूका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे आदेश अपर निबंधक तथा सहसचिव संतोष पाटील यांनी काढले आहेत.
मात्र हे आदेश सहकारी संस्थासाठी असून बाजार समितीसाठी नाहीत, असा खुलासा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे बार्शी बाजार समितीची प्रक्रिया सुरु राहणार की, पुढे ढकलण्यात येणार याविषयी आता शंका उपस्थित केली जात आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज