टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे आज शुक्रवारी वितरण करण्यात येणार आहे.
याप्रसंगी जिल्ह्यातील आमदार, खासदार, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.
आज शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण हुतात्मा स्मृती मंदिर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
२०२० – २१, २०२१-२२ व २०२२ -२३ या तीन आर्थिक वर्षातील ७१ जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षापासून शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते.
सर्वसाधारण संवर्गातून दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये करुणा गुरव (जि. प. शाळा मिरजगी, ता. अक्कलकोट), संगीता बांगर (जि. प. शाळा गाताचीवाडी, ता. बार्शी), प्रफुल्लता सातपुते (जि. प. शाळा वैदवस्ती, देवळाली, ता. करमाळा), प्रतिभा नवले (जि. प. शाळा केदारवस्ती, उपळाई, ता. माढा), सोनी कानडे (जि. प. शाळा माळशिरस),
अमित भोरकडे (जि. प. शाळा आसबेवाडी, ता. मंगळवेढा), परवेज मा. रफिक शेख (जि. प. शाळा, भोसलेवस्ती, ता. मोहोळ), चंद्रकांत माळी (जि. प. शाळा, कोरके वस्ती – दोन, ता. पंढरपूर), खुशालोद्दीन उस्मान शेख (जि. प. शाळा, सांगोलकर-गवळी वस्ती, ता. सांगोला), शुभांगी पवार (जि. प. शाळा, बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर), मानसिंग पवार (जि. प. शाळा, बाळगी, ता. दक्षिण सोलापूर).
माध्यमिक संवर्गातील पुरस्कार माढा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील किरण भांगे यांना तर विशेष पुरस्कार मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील इंदिरानगर जिल्हा परिषद शाळेतील यशवंत कांबळे यांना जाहीर झाला आहे. शिष्यवृत्ती पुरस्कारामध्ये अंबाराय उजनी (जि. प. शाळा सिन्नुर क, ता. अक्कलकोट), सोमेश्वर देशमाने (जि. प. शाळा पानगाव – दोन, ता. बार्शी), राणी क्षीरसागर (जि. प. शाळा वरकरने, ता. करमाळा),
अशोक ढोबळे (जि. प. शाळा मोडनिंब नं. एक, ता. माढा), वैशाली भागवत (जि. प. शाळा पिलीव मुले, ता. माळशिरस), शोभा कोलते (जि. प. शाळा भाळवणी, ता. मंगळवेढा), दत्तात्रय डोके (जि. प. शाळा पापरी, ता. मोहोळ), शरद बिराजदार (जि. प. शाळा नेमतवाडी, ता. पंढरपूर), स्वाती निळकंठ (जि. प. शाळा एकतपुर, ता. सांगोला), सरस्वती पवार (जि. प. शाळा अकोलेकाटी, ता. उत्तर सोलापूर), विलास गिराम (जि. प. शाळा संगदरी, ता. दक्षिण सोलापूर).
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज