टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील शिवप्रेमी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा परिसरात सुशोभीकरण करण्याबाबत आज सर्व शिवभक्तांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांची भेट घेतली आहे.
दोन दिवसात कामात सुरुवात न झाल्यास नगरपालिकेसमोर बेमुदत हे आंदोलन करणार असल्याचा इशारा सर्व शिवभक्तांनी दिला आहे.
मंगळवेढा शहरामध्ये शिवप्रेमी चौक येथे गट नंबर 26 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा या ठिकाणी परिसर सुशोभीकरण करणे या कामाची निविदा आचारसंहितेमुळे प्रलंबित होती.
आचारसंहितेनंतर निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून तात्काळ निविदा उघडून सदर काम सुरू करण्याचे आदेश ठेकेदार अस देण्यात यावे.
सदर प्रक्रिया दोन दिवसात म्हणजेच गुरुवार दिनांक 27 जून पर्यंत न झाल्यास मंगळवेढा शहरातील व तालुक्यातील समस्त शिवभक्त नगरपालिकेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला आहे.
याप्रसंगी अजित जगताप, चंद्रकांत पडवळे, प्रवीण खवतोडे , गौरीशंकर बुरकुल, सोमनाथ माळी, राहुल सावंजी, संभाजी घुले, ज्ञानेश्वर कोंडूभैरी, गणेश सावंजी, सतीश दत्तू, हर्षद डोरले,
आनंद मुढे, सुदर्शन यादव, सुशांत हजारे, अजिंक्य घुले, रविराज शिंदे, राहुल दत्तू, सचिन साळुंखे, विक्रम शेंबडे, अनिकेत हजारे, सुधीर भगरे, मनोज बाबर, तोशिब बागवान, अजय गाडे, प्रशांत खवतोडे, हरी दत्तू, चंद्रकांत चेळेकर, रविकिरण जाधव, विजय हजारे, विनायक हजारे आदीजन उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज