मंगळवेढा टाईम्स न्युज : संपादक समाधान फुगारे
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या बैठकीत सिध्देश्वर आवताडे यांनी सर्वांचे विचार घेऊन येत्या दोन दिवसात निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, सिध्देश्वर आवताडे बोलताना कार्यकर्त्यांविषयी असलेले प्रेम व्यक्त केले, माझ्या कार्यकर्त्यांना कसलाच त्रास झाला नाही पाहिजे अशी भावना आवताडे यांनी व्यक्त केली यावेळी कार्यकर्ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
सिध्देश्वर आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, कोणतीही निवडणुक असो कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय आम्ही घेत नाही, सर्वांचा विचार घेऊनच निर्णय घेतला जातो.
सर्वसामान्याच्या जनतेच्या विकासासाठी आजपर्यंत आम्ही निर्णय घेत आलो आहे. नागरिकांना न्याय देण्याची भूमिका पार पडली आहे. राजकारण करत असताना मनामध्ये कोणताही दुजाभाव न ठेवता काम करत आलो आहे. सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्या कार्यकर्त्याच्या हितापुढे कोणीही आडवे आले तर मी त्यांच्या पुढे उभा असतो. कार्यकर्त्याचे काम होण्यासाठी मी सर्वांपुढे हात जोडतो. कार्यकर्त्यांच्या हितासाठी मी काहीही करायला तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
दोन डिग्रीवर हात ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचे टोचले कान
जे कार्यकर्ते दोन डिग्रीवर हात ठेऊन आहेत अशा कार्यकर्त्यांची कानउघाडणी सिद्धेश्वर आवताडे यांनी केली आहे. असले उद्योगधंदे बंद करून एकनिष्ठ राहिले पाहिजे असा मोलाचा सल्ला देखील दिला.
व्यासपीठावर जेष्ठ नेते बबनराव आवताडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशील आवताडे, राजाभाऊ चेळेकर, दामाजीनगरचे सरपंच जमीर सुतार, शैलेश आवताडे, शेतकरी नेते सिध्देश्वर हेंबाडे, अँड.दत्तात्रय तोडकरी, प्रकाश जुंदळे, सिध्देश्वर कनशेट्टी, पाठखळ सरपंच ऋतुराज बिले, बावची उपसरपंच दत्तात्रय जाधव यांच्यासह हजारो पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संजय पवार बोलताना म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून बबनराव आवताडे यांनी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याच धर्तीवर सिध्देश्वर आवताडे आता हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. आज आवताडे गट कोणताही निर्णय घेतला तरी सर्व जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले.
अँड.दत्तात्रय तोडकरी, ऋतुराज बिले, हणमंत मासाळ, मोहसीन मुलाणी, जमीर सुतार, यांनी मनोगत व्यक्त केली. सूत्रसंचालन भारत मुढे, प्रास्तविक प्रा.समाधान क्षीरसागर यांनी केले तर आभार राजाभाऊ चेळेकर यांनी मानले.
राजाभाऊ चेळेकर यांचा भालकेंला टोला
खासदार प्राणिती शिंदे यांना तालुक्यातून 45 हजार मताधिक्य मिळाले ते केवळ बबनराव आवताडे यांच्या मुळे मिळाले आहेत. काही लोक छाती मोठी करून माझ्यामुळे मते मिळाली असल्याचे गवगवा करत असल्याचा टोला काँग्रेस नेते राजाभाऊ चेळेकर यांनी भालके यांना लगावला आहे.
24 तास जनतेसाठी कार्यरत असलेली बाप-लेकाची जोडी
मंगळवेढा तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून बबनराव अवताडे हे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आपल्या कार्यालयात हजर असतात व प्रश्न मार्गी लावतात. त्याचबरोबर सिद्धेश्वर अवताडे हेही तरुण वर्गामध्ये अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व असून सर्वसामान्य जनतेची नाळ जोडून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी 24 तास कार्यरत असलेली बाप लेकाची जोडी असल्याचे उद्धार राजाभाऊ चेळेकर यांनी काढले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज