टीम मंगळवेढा टाईम्स । समाधान फुगारे
श्री.संत दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत 20 जागांसाठी चुरशीने 85.45 टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीत 47 उमेदवार रिंगणात आहेत.
निकालासाठी रात्री उशिरापर्यंत वाट पाहावी लागणार
मतमोजणीसाठी 648 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 28 टेबलवर 4 राऊंडद्वारे मतमोजणी केली जाणार आहे. निकालासाठी रात्री उशिरापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
दामाजी कारखान्याच्या 20 जागांसाठी निवडणूक झाली. ही निवडणूक सत्ताधारी आमदार आवताडे व समविचार गट अशी दुरंगी लढत झाली.
दोन्ही पॅनल प्रमुखांकडून विजयाचा दावा
दरम्यान, दोन्ही पॅनल प्रमुखांकडून विजयाचा दावा केला जात आहे. गेल्या महिन्याभरापासून एकमेकांवर झालेले आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक कमालीची गाजली.
कारखान्याचे मुद्दे वगळता इतर वैयक्तिक मुद्द्यांवर टीका झाल्याने शेवटच्या टप्प्यात प्रचाराची पातळी ही घसरल्याचे चित्र होते.
4 हजार 174 मतदारांनी मतदानच केले नाही
या निवडणुकीत 28 हजार 695 मतदारांपैकी 24 हजार 521 मतदारांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला. तर 4 हजार 174 मतदारांनी मतदानच केले नाही. याचा फटका कोणाला बसणार याचीही चर्चा रात्री सुरू झाली.
संस्था मतदारसंघ एकूण 160 पैकी 154 असे एकूण सरासरी 85.45 टक्के मतदान झाले आहे.
अशी असेल मतमोजणी
गुरुवारी पोलीस स्टेशन समोरील शासकीय गोडाऊनमध्ये सकाळी ८ वा. मतमोजणीला सुरुवात होईल. ही मतमोजणी 28 टेबलवर 4 राऊंडद्वारे घेतली जाणार आहे.
त्यासाठी प्रत्येक टेबलवर जवळपास 6 ते 8 कर्मचारी नियुक्त केले जाणार असून एकूण 648 कर्मचारी तैनात असणार आहेत. 28 वा टेबल संस्था मतदारसंघासाठी ठेवण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज