mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

डॉ.वळसंगकर आत्महत्या प्रकरणात आता संशयाची सुई फिरतेय कुटुंबीयांभोवतीच; तपासात कमालीची गुप्तता; दुहेरी कारण पुढे; पोलिसही अचंबित; वेगळी माहिती हाती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 23, 2025
in आरोग्य, क्राईम, सोलापूर
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

नामवंत न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आपल्या पिस्टलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांकडून कसून सुरु असलेल्या तपासात संशयाची सुई ही कुटुंबीयांभोवती फिरत असल्याचे न सांगण्यात येत आहे. या प्रकाराचा लवकरच पूर्णपणे उलगडा होईल असेही आता पोलिसांकडून सांगण्यात येत आहे यामुळे आता या तपासाकडे साऱ्याचेच लक्ष लागून राहिले आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवार, १८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८:४० वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या घरी डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.

त्यांचे चिरंजीव डॉ. अश्विन वळसंगकर यांनी दिलेल्या सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन हॉस्पीटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या मनीषा मुसळे-माने (वय-४५, रा. बसवराज नेले नगर, जुळे सोलापूर) हिच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली.

न्यायालयासमोर तिला हजर केले असता न्यायदंडाधिकारी यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तिची ही पोलीस कोठडी बुधवार, २२ एप्रिल २०२५ रोजी संपणार आहे. पोलिसांनी तिला उद्या न्यायालयासमोर हजर करुन तपासासाठी वाढीव पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. दरम्यान, पोलिसांकडून सुरु असलेल्या तपासात आणि चौकशीत काही वेगवेगळ्या गोष्टी पुढे आल्या आहेत. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाचा अँगल देखील बदलला आहे.

यामध्ये दोन वेगवेगळ्या बाबींवर संशय असल्याने पोलिसांनी या दोन्ही कारणांना डोळ्यासमोर ठेवून तपासाची गती वाढविली आहे. अटक करण्यात आलेल्या त्या महिलेबरोबर संशयाची सुई ही कुटुंबीयांभोवती फिरत असल्याने अधिक जोमाने तपासाची चक्रे फिरविण्यात आली आहे. यातील फिर्यादी डॉ. अश्विन वळसंगकर यांच्याकडून अधिक माहिती घेत डॉ. शिरीष वळसंगकर यांची सून डॉ. शोनिया वळसंगकर यांच्यासह इतरांकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून याप्रकरणी कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

कॉल रेकॉर्ड तपासणीत गुप्तता

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मोबाईल क्रमांकावरील संपूर्ण डाटा पोलिसांनी मिळविला आहे. कधी, कोणाचे कॉल आणि मेसेज प्राप्त झाले. त्यास डॉक्टरांनी काय उत्तर दिले. घटनेपुर्वी आणि घटनेच्या दिवशी कोणाकोणाचे कॉल आणि मेसेज आले, याची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे. मात्र या रेकॉर्ड तपासणीत आढळलेल्या बाबींमध्ये पुढील तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी गुप्तता पाळल्याचे दिसून आले.

दुहेरी कारण पुढे; पोलिसही अचंबित

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येचा पोलिसांकडून चौफेर पध्दतीने तपास केला जात आहे. यातून अधिक संशय बळावत असलेली दोन कारणे पुढे येत असल्याने पोलीसही अचंबित झाल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयातील ‘त्या’ महिलेसह कुटुंबाभोवती संशयाची सुई फिरत असल्याने दोन्ही बाजूने तपास सुरू आहे, पण एका बाजूला टार्गेट करुन दुसरी बाजू झाकण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? या अँगलने देखील पोलीस तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.

अन् त्यांनी बदलले मृत्यूपत्र

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही बाबींवरुन त्रास करुन घेतला असावा की त्यामुळे त्यांना टोकाची भूमिका घ्यावी लागली. शिवाय आपल्या वकिलांची भेट व सल्ल्यानुसार मृत्युपत्र देखील बदलल्याचा प्रकार पुढे येत असल्याने त्याची चौकशी आणि त्या बाजूने सखोल तपास केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यायालयात यावर उद्या पोलिसांकडून प्रकाश टाकण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शिरीष वळसंगकरसोलापूर डॉक्टर

संबंधित बातम्या

सिनेअभिनेत्री शिवाली परब आणि सिनेअभिनेते संदीप पाठक आज थेट ‘भालेवाडी’करांच्या भेटीला; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मिळणार बळ

सिनेअभिनेत्री शिवाली परब आणि सिनेअभिनेते संदीप पाठक आज थेट ‘भालेवाडी’करांच्या भेटीला; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मिळणार बळ

January 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

भयंकर! सॉफ्टवेअर इंजीनिअरला जुगाराचा नाद…; आर्थिक नुकसान अन् चार्जिंग केबलने फाशी घेत टोकाचं पाऊल

January 8, 2026
धडाकेबाज कामगिरी! उजनी वसाहत पंढरपुर येथील अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाची कारवाई; 10 निवासस्थाने केली रिक्त

धडाकेबाज कामगिरी! उजनी वसाहत पंढरपुर येथील अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाची कारवाई; 10 निवासस्थाने केली रिक्त

January 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बापरे..! आईवरून शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या मित्राचा दगडाने ठेचून केला खून; परिसरात उडाली एकच खळबळ

January 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Breaking! बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; मृताच्या कुटुंबाविरोधातच गुन्हा दाखल

January 5, 2026
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! वर्षभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केली; आता शेतकरी पतीची आत्महत्या; आई-वडील दोघांनाही गमावल्याने दोन मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

January 4, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

राजकीय घडामोडीला वेग! ‘या’ पद्धतीने नगरसेवक करणार उपनगराध्यक्षांची निवड; ‘या’ तारखेपूर्वी उपनगराध्यक्ष, २० नंतर समित्यांच्या निवडी

January 4, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

मोठी बातमी! तीन दिवसांपूर्वी काढलेला ‘ईसीजी’ नॉर्मल; ‘गोल्डन अवर’मध्ये मिळाला उपचार, डॉक्टरांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्र संभ्रमात

January 6, 2026

मोठी बातमी! वाळू माफियांच्या वकिलावरील हल्ल्यानंतर महिन्याभरातच सोलापूर जिल्ह्यातील पोलिसावर प्राणघातक हल्ला

January 3, 2026
Next Post
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

करारा जवाब मिलेगा! पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारचा पाकिस्तानला थेट इशारा; केली मोठी घोषणा

ताज्या बातम्या

सिनेअभिनेत्री शिवाली परब आणि सिनेअभिनेते संदीप पाठक आज थेट ‘भालेवाडी’करांच्या भेटीला; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मिळणार बळ

सिनेअभिनेत्री शिवाली परब आणि सिनेअभिनेते संदीप पाठक आज थेट ‘भालेवाडी’करांच्या भेटीला; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मिळणार बळ

January 8, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

कामाची बातमी! एकदा आरक्षणाचा फायदा घेतला तर खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

January 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

भयंकर! सॉफ्टवेअर इंजीनिअरला जुगाराचा नाद…; आर्थिक नुकसान अन् चार्जिंग केबलने फाशी घेत टोकाचं पाऊल

January 8, 2026
शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

Breaking! सरकारचा आता आणखी एक मोठा निर्णय; नव्या निर्णयामुळे विरोधी पक्षाची होणार मोठी गोची

January 8, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! शिष्यवृत्ती परीक्षा सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी; तारखेचीही घोषणा…

January 7, 2026
“मिल्क ॲन्ड मिलेट व्हिलेज” भालेवाडीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल व हुरडा पार्टी; सरपंच दवले यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन; महाराजांचा पोवाडा सादर करून कार्यक्रमात रंगत

“मिल्क ॲन्ड मिलेट व्हिलेज” भालेवाडीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल व हुरडा पार्टी; सरपंच दवले यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन; महाराजांचा पोवाडा सादर करून कार्यक्रमात रंगत

January 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा