टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील नवरात्र महोत्सवातील देखावे व विद्युत रोषणाई पाहण्यासाठी ग्रामीण भागाबरोबर अन्य तालुक्यातून येणाऱ्या गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असून सराफ गल्ली व बाजार चौकातील देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांग दिसून आली.
देशाला आदर्श घालणारी नवरात्र महोत्सवाची एक वेगळीच परंपरा आहे यामध्ये नवरात्र महोत्सव मंडळाचा अध्यक्षाचा मान मुस्लिम समाजाला देण्याचा आदर्श देखील मंगळवेढ्यानेच घालून दिला. शहर व ग्रामीण भागात 82 नवरात्र मंडळाकडून देवीची स्थापना केली.
सराफ गल्ली येथे 51 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रशांत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली केरळ येथील दुर्गा राजवाडा हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी होत आहे.
यंदा शहरातील विविध मंडळांनी विद्युत रोषणाई बरोबर ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देणारे,जिवंत देखावे उभे केले.बौध्दीक मेजवानी देणारी व्याख्यानमाला,धार्मीक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे नियोजन केले असून रोषणाई,
देखावे व कार्यक्रम पाहण्यासाठी मंगळवेढ्याबरोबर लगतच्या तालुक्यातील नागरिक दररोज संध्याकाळी मंगळवेढ्यात येवू लागल्याने शहरात मोठी गर्दी होत असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने व
शहरातून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनावर उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी शहरांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.
गर्दीत चोरीच्या घटना घडवून येत म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे मंडळाकडून लावण्यात आले. सराफ गल्ली,हजारे गल्ली,होनमाने गल्ली, बाजार चौक, कुंभार गल्ली, बोराळे नाका, नागणे गल्ली, मेटकरी गल्ली,
माळी गल्ली,कौडूभैरी गल्ली,जगदाळे गल्ली,माने गल्ली,येथील नवरात्र जल्लोषात साजरा होत असल्यामुळे शहरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले.
देवीच्या दर्शनासाठी अनेक देवीसमोर भाविकांची रांग लागली.यानिमित्ताने छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली.
सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांच्या अदा पाहण्यासाठी देखील नागरिकांचा उत्साह दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी पूजा देवीची पूजा करून आपले राजकीय बस्थान सुरक्षित ठेवण्याचा सुरू केला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज