टीम मंगळवेढा टाईम्स ।
इस्लाम धर्मियांचे प्रार्थना स्थळ असलेल्या मशिदीची ओळख सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, या उद्देशाने सोलापुरात दरवर्षी एक अनोखा उपक्रम राबवला जातो.
जमीयत ए अहले हदिस यांच्या वतीने यावर्षीही चार हुतात्मा चौक समोरील हाजी हजरत खान मस्जिद या ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उपक्रमाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते पार पडले.
मुस्लिम बांधवाचे प्रार्थना स्थळ असलेल्या मस्जिद विषयी अनेकांच्या मनामध्ये कुतूहल असते. मशीद म्हणजे काय? तिथे काय नेमकं काय केलं जातं? अजान, वजु, नमाज म्हणजे काय? असे विविध प्रश्न सर्वसामान्य मुस्लिमेतर बांधवाच्या मनात असतात.
या प्रश्नांची उकल व्हावी तसेच सोलापुरात सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी मेक इंडिया बेटर कॅम्पेन अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले.
अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर मोनिका सिंग ठाकूर यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरसह सर्वांनी मशीदबाबत अगदी उत्सुकतेने माहिती जाणून घेतली.
प्रारंभी जमीयतच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर मोनिका सिंग ठाकूर यांच्यासह सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
मस्जिद परिचय हा उपक्रम 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान दुपारी साडेतीन ते रात्री 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. चार हुतात्मा चौक समोरील हाजी हजरत खान मशीद या ठिकाणी हे उपक्रम आयोजित केले आहे.
ही मशीद तब्बल 105 वर्ष जुनी आहे. हे उपक्रम सर्वधर्मीय नागरिकांसाठी असून महिलांसाठी देखील मशीदीत प्रवेश खुला असणार आहे.(स्रोत:News 18 लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज