मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
ऑनलाइन ॲप द्वारे महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिला बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती दास असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी अपूर्वा संजय गायकवाड (वय २६, रा. विजय देशमुख नगर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांना आयसीआयसीआय बँकेचे प्लॅटिनम कार्ड ऍक्टिव्ह करण्यासाठी आरोपी स्वाती दास हिने फोन करून अपूर्वा यांचा विश्वास संपादन करून बँकेचे मोबाईल ॲप सुरू करण्यास सांगितले.
त्यात प्रोसेस करण्यास सांगितले. त्यावेळी फिर्यादीला एक ओटीपी आला व त्यांनी तो ओटीपी दिल्यानंतर काही वेळाने अपूर्वा गायकवाड यांच्या क्रेडिट कार्डवरून ६३ हजार ८१७ रूपये कट झाल्याचा मोबाईलवर मेसेज आला. याप्रकरणी त्यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक जगताप करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज