टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात गेली चार दिवस रात्रीच्यावेळी आकाशात ड्रोन घिरट्या मारत असल्याने नागरिकामध्ये साशंक्ता व्यक्त करीत भीतीचे वातावरण तयार होत आहे. दरम्यान काही नागरिकांनी पोलीस प्रशासनास ड्रोनबाबत कळविल्याने पोलीसांनी घाबरुन जावू नये असे आवाहन नागरिकांना केले आहे.
तालुक्याच्या दक्षिण भागात मागील चार दिवसापुर्वी रात्रीच्यावेळी अवकाशात ड्रोन फिरत असल्याचे अनेक नागरिकांनी पाहिले होते. काहींनी चोरटे आल्याची अफवाही पसरविली होती.
या अफवेमुळे अक्षरश: नागरिकांनी एकमेकांना फोन करुन काही ठिकाणी रात्र जागून काढल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांनी प्रत्यक्ष पोलीस निरीक्षक यांना भेटून ड्रोनबाबत कल्पनाही दिली आहे. रविवार व सोमवार सलग दोन दिवस रात्री 8 च्या पुढे भीमा नदी काठ परिसरातील ब्रम्हपुरी,माचणूर, मुंढेवाडी या परिसरात एकाच वेळी चार ड्रोन अवकाशात फिरत असताना अनेकांनी या ड्रोनला कॅमेरात कैद केले आहे.
हे ड्रोन कशासाठी फिरतात? याचे नेमके कारण स्पष्ट होत नसल्यामुळे शंका,कुशंका नागरिकामधून व्यक्त होत आहेत. मागील महिन्यात स्फोटाच्या आवाजाने मंगळवेढा हादरुन गेला होता.
हा आवाज नेमका कशाचा होता? याचे गुढ अद्यापही उकलले नसताना सध्या अवकाशात रात्रीच्यावेळी फिरत असलेल्या ड्रोनमुळे त्यात आणखीन भर पडली आहे.
या ड्रोनचा जिल्हाधिकारी कार्यालयाने व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी खुलासा करुन नागरिकामधील भीती दूर करावी अशी मागणी जनतेमधून पुढे येत आहे.
ड्रोनला भिण्याचे काहीही कारण नाही
ड्रोनच्या संदर्भात जे भितीदायक वातावरण मंगळवेढा तालुक्यात तयार झाले आहे त्या संदर्भात नागरिकांना आवाहन करू इच्छितो ड्रोनला भिण्याचे काहीही कारण नाही. ड्रोन हे फिरत असतात.
त्यातील एक ड्रोन नागरिकांनी पाडून आमच्याकडे जमा सुद्धा केला आहे. अशा ड्रोनला शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. आमची पोलिस गाडी गस्तसाठी फिरत असते. ज्या नागरिकांना ड्रोन निदर्शनास आल्यास ताबडतोब माझ्याशी संपर्क साधावा.- महेश ढवाण,पोलिस निरीक्षक, मंगळवेढा
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज