टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा, रहाटेवाडी, तामदर्डी व पंढरपूर तालुक्यातील कौठाळी, शिरढोण यासह नदीकाठच्या गावांमध्ये जमिनीचे क्षारपड होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
जर वेळीच विचार नाही केला तर शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यावर सरकारने प्रयत्न करावे, असे याकडे आमदार समाधान आवताडे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला.
आमदार आवताडे म्हणाले, पाटबंधारे विभागाने सन २०२० २१ ला सर्व्हे केला होता. त्यावर उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र आजतागायत उपाययोजना देण्याची झालेल्या नाहीत.
सांगली जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या भूमिगत चार योजना तातडीने सोलापूर सोलापूर जिल्ह्यात राबवणार काय? क्षारपड जमीन तथा पाणथळ जमिनीची समस्या आटोक्यात आणण्यासाठी शासन योजना राबवणार का?
क्षारपड जमिनीचे मुख्य कारण असलेल्या रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करणार काय? असा प्रश्न उपस्थित केला.
यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात उत्तर देताना म्हणाले, मंगळवेढा व पंढरपूर या दोन्ही तालुक्यांचा विचार करता गेल्या तीन वर्षांमध्ये क्षारपड क्षेत्रात ५७ हेक्टर एवढीच वाढ झाली आहे.
याचा अर्थ कुठेतरी आपल्याला लक्ष आवश्यकता आहे. पहिल्यांदा जमीन पाणथळ होते. प्रभावी सिंचनामुळे विशेषतः उसाचा पट्ट्यात प्रवाही सिंचन करतो त्यामुळे त्या ठिकाणी थांबून राहते.
मोठ्या प्रमाणात जेव्हा रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीचे पाणी धरण्याची क्षमता वाढते. या संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या वतीने नैसर्गिक शेतीचा एक कालबद्ध कार्यक्रम तयार आहे.
सांगली जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवलेला जमिनीखालून चर काढून क्षारपडचे प्रमाण कमी करण्याचा प्रयोग जर यशस्वी झाला.
तर मंगळवेढा पंढरपूर तालुक्यात हा प्रयोग राबवून क्षारपडचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील व सेंद्रिय शेतीवर भर देण्यासाठी लवकरच योजना आखल्या जातील.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज