टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात गेल्या आठ दिवसांत चोरट्यांकडून सात ते आठ दुकानदारांची दुकाने फोडून रोख रक्कम व साहित्य चोरीस जात आहे. चोरीची तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याने चोरट्यांचा तपास लावावा व गुन्हे नोंद करून घ्यावेत, या मागणीसाठी येथील दोन व्यापारी संघटनांनी पोलीस निरीक्षक महेश ढवण यांना निवेदन दिले आहे.
मंगळवेढा व शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांकडून व्यावसायिकांना लक्ष्य केले जात आहे. मध्यरात्री एक ते चारच्या वेळेत पत्र्याची दुकाने व शटर खोलून चोरी केली जात आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी मरुड येथे दोन इलेक्ट्रॉनिक दुकाने फोडली असून, दि. ८ रोजी मंगळवेढा येथे श्रीपाद कृषी केंद्र दुकानाचे शटर खोलून सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर व रोख रक्कम असा एक लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
तसेच बोला नाका परिसरात असलेल्या राजू काळुंगे यांच्या दुकानातील शटर उचकटून स्क्रॅप असलेली कॉपरची वायर चोरून नेली आहे. तसेच पंढरपूर रस्त्यावरील सप्तशृंगी मंदिराजवळ असलेल्या सुनील लोखंडे यांच्या मशिनरी दुकानातील रोख रक्कम व काही साहित्य असे १३००० रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे.
वाढत्या चोरांमुळे नागरिक व व्यापारी त्रस्त झाले आहेत. जुन्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास रखडलेला असताना नव्या चोऱ्या वारंवार होऊ लागल्यामुळे पोलिसांच्या कर्तव्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. चोरी झालेल्या नागरिकाला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर केवळ तक्रार अर्ज घेतला जातो,
परंतु त्याची एफआयआर केली जात नाही. त्यामुळे चोरी झालेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागते. चोरी झालेल्यांनाच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने येथील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या झालेल्या चोऱ्यांचा तातडीने तपास लावावा व ज्यांची चोरी झाली आहे अशा नागरिकांचे व्यक्तींचे गुन्हे नोंद करून घ्यावेत, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी दि. ९ रोजी येथील पोलीस निरीक्षक महेश ढवण यांना निवेदन दिले असून, यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खांडेकर, चंद्रशेखर कोंडुभैरी, बाळासाहेब सावंत, अशोक लोहकरे, सिद्धेश्वर भगत, प्रकाश काळुंगे, प्रदीप देशमुख, अभिजीत लोखंडे, सुनील लोखंडे, अविनाश कुलकर्णी, बसवेश्वर माळी, दादा पठाण, राजू काळुंगे, शिवजित पाटील, समाधान हेंबाडे आदी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज