mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नयनरम्य! गुरु-शिष्य पालखी भेट सोहळ्यात भक्तीमय वातावरणात भंडारा, लोकरची उधळण; शेतकऱ्यांना येणार चांगले दिवस; पुजाऱ्यांनी वर्तवली ‘ही’ भाकणुक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 14, 2023
in मंगळवेढा
नयनरम्य! गुरु-शिष्य पालखी भेट सोहळ्यात भक्तीमय वातावरणात भंडारा, लोकरची उधळण; शेतकऱ्यांना येणार चांगले दिवस; पुजाऱ्यांनी वर्तवली ‘ही’ भाकणुक

टीम मंगळवेढा टाईम्स। 

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लाखो भाविकांचे असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे महालिंगराया व बिरोबा (गुरू) पालखी भेट सोहळा मोठ्या उत्साहात पार संपन्न झाला आहे.

लाखो भाविकांनी महालिंगराया -बिरोबाच्या नावानं चांगभलं या गजरात मुक्तहस्ताने  भंडारा ,खारीक व लोकरची उधळण केली . मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखी भेट सोहळा आयोजित उत्साहात संपन्न झाला.

गेल्या आठवड्याभरापासून हा ऐतिहासिक सोहळा सुरू आहे. दररोज लाखोच्या संख्येने भाविक श्री क्षेत्र हुलजंती येथे दाखल झाले  होते. काल सोमवारी पहाटेपासून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मुंडासचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

जगातील एकमेव ठिकाण  स्वर्गातून शंकर-पार्वती महालिंगरायाच्या मंदिराला पंच शिखराला  मुंडास (आहेर) बांधले जाते. हे मुंडास मध्यरात्री शंकर व पार्वती यांच्या कृपने होते. अशी अख्यायिका आहे. या मुंडासचे (ध्वज) दर्शन घेण्यासाठी भाविक लाखोच्या संख्येने दाखल होतात.

अमावस्येच्या रात्री शिवपार्वती येथे भूकैलास हुलजंती  होई जन्माला येऊन एकदा मुंडास पाही याचं उक्तीप्रमाणे भाविक मोठ्या भक्ती भावाने  दिवसभर दर्शन घेत होते.

तसेच (गुरु) बिरोबा -महालिंगराया( शिष्य )यांच्या पालखी भेट सोहळ्यासाठी नयनरम्य दर्शनासाठी मंदिराच्या बाजूने वाहत असलेल्या ओढ्यात लाखो भाविकांची  गर्दी झाली होती.

यावेळी ढोल कैताळ नगाराच्या गजारात आकाशात भंडारा व लोकरची उधळण करत बिरोबा महालिंगरायाच्या नावानं चांगभले या जयघोषात पालखी भेट सोहळा पार पडला. दरम्यान यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मठ व धार्मिक व्यक्तीने दासोह प्रसादाची सोय केलेली होती.भाविकांनी याचा लाभ घेतला.
या गुरू शिष्याच्या नयनरम्य भेट सोहळ्या अगोदर सात पालख्यांचा भेटीचा मान आहे. सोन्याळ (ता. जत) येथील विठुराया, उटगी येथील भरमदेव, चडचण येथील शिरडोन येथील बिरोबा यासह अन्य देवाच्या पालख्यांचा भेट सोहळा होतो.
 एक महान चरित्र,विर सिद्धपुरुष नायक मराठी भुमीमध्ये जन्म घेऊन सर्व भाषेच्या सीमा पार करून कन्नड मराठी, तेलगू लोकांच्या मनावर आजतागायत निर्विवाद अधिराज्य गाजवतो. याची अनुभूती या यात्रेत गेल्यानंतर मिळते. महालिंगरायाच्या भक्तीचा महिमा डंका महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात आहे.

अशी भाकणुक वर्तवली

सात पालख्यांचा भेट सोहळा झाल्यानंतर पुजाऱ्यांनी भाकणूक वर्तवली. ज्वारी एक नंबर असेल. ज्याच्याकडे बैल असेल तो श्रीमंत ज्याच्याकडे गाई असेल तो पालखीत बसेल. उत्तर दिशेला ठाबठूब असेल. बन फुटेपर्यंत पाऊस असणार आहे. जत्रा फुटेपर्यंत पाऊस एक सरी होईल. अशी पुजाऱ्यांनी भविष्यवाणी (भाकणुक) वर्तवली.

यावेळी लाखो भाविकांनी श्री महालिंगरायाच्या नावानं चांगभलं चा गजर व लोकर, खारीक, खोबर भंडाऱ्याची उधळण भक्तीभावाने केली. या भाकणुकीला विशेष महत्व असते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गुरू शिष्य पालखी सोहळा

संबंधित बातम्या

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकले मीठ; मंगळवेढ्यात नामवंत कृषी केंद्राचा बोगस कारभार उघड; कृषी चालक व कंपनी संचालकावर गुन्हा दाखल

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मंगळवेढ्यात थरार! पोलिसांना गुंगारा देऊन सब जेलमधून पळाला; पण पोलिसांच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने कर्नाटक गाठून ठोकल्या बेड्या

June 11, 2026
बळ वाढले! आ.समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांचे मनोमिलन; कारखान्याच्या हितासाठी पाठिंबा केला जाहीर

दोन बैठका, एकच उमेदवार! मंगळवेढ्यात आवताडेंच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’ची चर्चा; काका-पुतण्याच्या लागोपाठ स्वतंत्र बैठका; राजकीय वर्तुळात खळबळ

June 10, 2026
​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

June 11, 2026
शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, बियाण्यांची चिंता मिटली! मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी दिली ‘ही’ अत्यंत महत्त्वाची माहिती

June 10, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

​भीषण अपघात! मंगळवेढ्याजवळ क्रेटा कारचा चक्काचूर, ‘या’ कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; २ जण जागीच ठार, तीन गंभीर जखमी; असा घडला थरकाप उडवणारा अपघात

June 10, 2026
Next Post
ऊसाची पहिली उचल 2500 जाहिर करा व अंतीम बिल 3100 द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीवर ठाम

पहिल्या १० दिवसात गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन २५०० प्रमाणे पहिला हप्ता जमा; सीताराम साखर कारखान्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड

ताज्या बातम्या

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

वाढदिवसाचे अनोखे कौतुक! हजारोंची उपस्थिती, ५११ रक्तदाते अन् संतांच्या वेशात सत्कार; उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस ठरला ऐतिहासिक

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! खताच्या नावाखाली शेतकऱ्यांना विकले मीठ; मंगळवेढ्यात नामवंत कृषी केंद्राचा बोगस कारभार उघड; कृषी चालक व कंपनी संचालकावर गुन्हा दाखल

June 12, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

​राजेंद्र राऊतांच्या बैठकीला मविआचे आमदार हजर, पण भाजपचेच ‘परिचारक’ गैरहजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 12, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको! शिक्षण विभागाचे ‘ते’ दोन्ही आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात मोठा दिलासा; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

June 12, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावध व्हा! ‘फ्री गिफ्ट व्हाउचर’च्या आमिषाने ४० हून अधिक जोडपे फसले; ​परदेशवारीच्या नावाखाली दाम्पत्यांना लाखोंचा चुना

June 12, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..