टीम मंगळवेढा टाईम्स ।
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
यानंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती.
मात्र, दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता मुंबई, पुण्यासह नाशिक, पिंपरी-चिंचवड व अन्य काही शहरातील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान, उर्वरित राज्यात या वर्गांसाठी शाळा खुला झाल्या असून पालक सावध भूमिका घेत आहेत.
त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अजूनही अत्यल्प प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन शिक्षणालाच प्राधान्य दिलं जात आहे.
सद्या, ५ वी ते ८ वी च्या शाळा सुरु करण्याबाबत कोणताच विचार नसल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
त्यामुळे, ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा व आरोग्य विषयक बाबींचा विचार करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज