मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सरकारच्यावतीने शेती पिकांना एक रुपयात दिली जाणारी पीक विमा योजना बंद केली असून यंदापासून नवीन पीक विमा योजना जाहीर केली आहे.
शेतकऱ्यांकरिता लागू करण्यात आलेल्या नवीन पीक विमा धोरणामधील जाचक अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे पीक विमा योजना राबविण्यात यावी,
यासाठी खा.प्रणिती शिंदे यांच्यावतीने मंगळवेढा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे व जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी दिनेश पारगे यांना निवेदन दिले.
या निवेदनाद्वारे खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता लागू करण्यात आलेल्या नवीन पीक विमा योजनेतील जाचक अटी रद्द होण्याकरिता विविध मागण्या केल्या आहेत.
पूर्वी १ रुपया भरून विमा मिळायचा, यामध्ये बदल करून सध्या १ रुपयाच्या योजनेऐवजी प्रत्यक्ष हप्ता भरावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ओझे वाढले आहे.
परिणामी लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना विमा घेणे परवडत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचा १ रुपयाप्रमाणे विमा भरुन घ्यावा. सरकारने निश्चित केलेल्या १२ गावांमध्येच पीक कापणी प्रयोग होणार आहे. याचा त्रास शेतकऱ्यांना होणार आहे.
स्थानिक नैसर्गिक आपत्तींना विमा नाही. शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसानीचा क्लेम करण्याचा अधिकार पूर्वीप्रमाणे रहावा.
डिजिटल कचाट्यात अडकलेले शेतकरी फार्मर आयडी, ई-पीक अॅप, आधार, बँक खाते सगळं लिंक असावं लागतं. बँकेने वेळेवर पैसे वळते केले नाहीत तर विमा रद्द होतो. ही सर्व प्रक्रिया सामान्य, वयोवृब्द शेतकऱ्याला अशक्य आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तरी शेतकऱ्यांकरीता लागू करण्यात आलेल्या नवीन पीक विमा धोरणामध्ये जाचक अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे पीक विमा योजना राबविण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज