टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा ते मरवडे जाणारे रोडवरील फटेवाडी पाटी येथे विनापरवाना परमिटने साधारण 4 ब्रास वाळु भरलेला टिपर (एम.एच.20 सी.टी 6000)
मंगळवेढा पोलिसांनी पकडला असून याप्रकरणी टिपर मालक सुमित फटे व रवि सिध्देश्वर बिरुनगे (रा.मरवडे ता मंगळवेढा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवेढा ते मरवडे जाणारे रोडने फटेवाडी पाटी येथे
संशयित आरोपी सुमित फटे (रा.मरवडे ता.मंगळवेढा) याच्या मालकीच्या पांढऱ्या रंगाच्या हायवा टिपरमध्ये विनापरवाना परमिटने साधारण 4 ब्रास वाळु भरलेली होती.
टिपरसह साधरण एकुण किंमत 16 लाख 24 हजार रुपयांचा अवैध वाळू वाहतुक करीत असताना टिपर मालक 1 ) सुमित फटे व 2) रवि सिध्देश्वर बिरुनगे यांना पोलीस पकडण्यास गेले असता ते अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज