मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी या गावामध्ये एकोणिसे बावन साली सुरु झालेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गेली दीड वर्षापासून शिक्षक नसल्याने स्थानिक गावकर्यांनी अनेक वेळा सबंधित वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेऊन तोंडी व लेखी निवेदन देऊन हेलपाटे मारले.
तरी सुद्धा शिक्षक न मिळाल्याने वर्गणी जमा करुन स्थानिक स्वयंसेवक यांच्या मदतीने मुलांच्या शिक्षणाची सोय केली. सध्या येथील पट संख्या 107 आहे मात्र कायम स्वरूपी एक ही शिक्षक नाही.
मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन देखील दखल न घेतल्याने आज रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी आंदोलन करण्याचा निर्णय सर्व पालक व विद्यार्थ्यांनी घेतला.
जयसिंग जाधव यांच्या नेतृत्वाखाली गावातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी काल सकाळी आठ वाजता सुरू केलेले आंदोलन रात्री दहा वाजता प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी व त्यांच्या पदाधिकारी यांच्या मध्यस्थीने
गट शिक्षणाधिकारी यांच्या कडून लवंगी येथील जि.प.शाळेला चार शिक्षक देण्याचे लेखी आस्वासन घेण्यात आले तसेच सोमवार पर्यंत तिन शिक्षक कायम स्वरूपी देण्याचे ठरले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष अजित कुलकर्णी यांना फोन करून तसेच शिक्षण अधिकारी जाविर सर यांच्याशी चर्चा करून त्यांनी आस्वासन दिल्या नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
जर सोमवार पर्यंत शिक्षक रुजु न झाल्यास प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन तिवृ करण्याचा ईशारा जयसिंग जाधव यांनी यावेळी दिला.
यावेळी गट शिक्षणाधिकारी लवटे साहेब प्रहारचे तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी,आंदोलन प्रमुख जयसिंग जाधव कार्याध्यक्ष आमोगसिद्ध काकणकी, चेतन वाघमोडे,
यावेळी गावचे सरपंच इलाई पाटील तसेच गावचे उपसरपंच नेते डॉक्टर कृष्णांत माने, समीर भाऊ जाधव, गुलचंद सवाईसर्जे,नवनाथ शिरसटकर,तानाजी जाधव, गावचे मेंबर शाहीर शेख, फैयाज मुजावर,सुरेश बुरंगे,निखिल जाधव, बंडू पुजारी, कादर पटेल,
गुलाब शेख, नितीन जाधव, भाऊ घाटगे, लक्ष्मण माने, लिंगु बिराजदार, जयवंत निकम,मानसिंग पवार सर, सुनील बनसोडे, विनीत बसबिरे,सखाराम चव्हाण,जगदीश बसबिरे, गपूर लाला शेख, विक्रम माने, सुरेश पांढरे, मयूर बसविरे,दत्ता लेंगरे,
धनाजी मनीमुले आरिफ शेख, शिवाजी भोसले, महादेव बाबर, रईस शेख, सचिन येरवी, साजन शेख, रामा चौगुले,जमीर शेख, तसेच इतर पालक वर्ग व विद्यार्थी हजर होते.गावातील ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज