टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्य राखीव पोलिस बल तथा एसपीएफ २४० शिपाई पदासाठीची भरती सोरेगाव येथील मैदानावर १९ जूनपासून सुरू असून, ती ७ जुलैपर्यंत चालणार आहे.
या प्रक्रियेत शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी उत्तेजित द्रव, स्टिरॉईड गोळ्या घेतल्यास आरोग्याला अपाय होईल, असे आढळल्यास भरतीप्रक्रियेतून वगळण्या येईल, असा इशारा कमांडट (समादेशक) विजयकुमार चव्हाण यांनी बोलताना दिला.
या प्रक्रियेमध्ये उमेदवारांची १०० मीटर धावणे, ५ किमी धावणे व गोळाफेक या मैदानी चाचणी घेण्यात येत आहे.
मैदानी चाचणीच्या वेळी काही उमेदवार शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी उत्तेजक द्रव, स्टिरॉईड गोळ्या किंवा इंजेक्शनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मैदानी चाचणीदरम्यान हे टाळावे. असे करण्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
त्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. असे प्रकार आढळल्यास संबंधित उमेदवारास भरती प्रक्रियेतून बाद ठरवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
उत्तेजक द्रव प्राशन करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी तपासणी पथक नेमण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही, हँड कॅमेरे लावण्यात आले आहेत.
वैद्यकीय पथकाच्या निदर्शनास संशयास्पद उमेदवार आढळल्यास संबंधिताचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
दोन दिवसात १३६६ जणांची मैदानी चाचणी एसआरपीएफच्या सोरेगाव येथील मैदानावर २७ जून रोजी ६४१ आणि २९ रोजी ७२५ अशा १३६६ जणांनी मैदानी चाचणी दिली.
दोन दिवसात ३० जणांना सबळ कारणास्तव पुढची तारीख देण्यात आली आहे. २७ जून रोजी १००७ जणांना बोलावण्यात आले होते पैकी ७३३ उपस्थित राहिले. त्यातून ६४१ चाचणीसाठी पात्र ठरले. १३ जणांना पुढची तारीख दिली.
२९ जून रोजी १००७ जणांपैकी ८०३ प्रत्यक्ष उपस्थित राहिले यातील ७२५ चाचणीसाठी पात्र ठरले १७ पुढील तारीख देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज