टीम मंगळवेढा टाईम्स ।
अनोळखी मोबाइल नंबरवरून आलेल्या टेक्स्ट मेसेजमधील लिंक ओपन करून पाहताच खातेदाराच्या बँक खात्यामधून तब्बल २ लाख ६५ हजार रुपये रक्कम क्षणात ट्रान्सफर झाली.
ही धक्कादायक घटना २० डिसेंबर रोजी १:३० ते ४:४५ या कालावधीत कराड अर्बन बँक, चाटी गल्ली येथे घडली.
याप्रकरणी खातेदार प्रकाश कृष्णात पाटील (निर्मलनगर, नवीन आरटीओ, विजापूर रोड, सोलापूर) यांनी सायबर पोलिस ठाण्याकडे धाव घेऊन फिर्याद दिल्याने शनिवारी गुन्हा नोंदला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी हे विजापूर रोडवरील निर्मलनगरात राहतात. त्यांचे एसबीआय बँकेत खाते आहे. २० डिसेंबर रोजी दुपारी १:३० ते पावणेपाच यादरम्यान, चाटी गल्ली येथील कराड अर्बन बँकेत आले.
तेथे अनोळखी ९४८१३१६२१५ या मोबाइल नंबरवरून dear sbi user your sbi yono A/c Will be blocked please update your pancard today login with sbi YONO getbankin click hear http://cptishortgy-SBI KYC असा मेसेज आला.
त्यानुसार फिर्यादीचे एसबीआय योनो अॅप ओपन झाले. त्यांनी विचारलेली माहिती फिर्यादी व फिर्यादीच्या खात्यातून अनोळखी ट्रान्स्फर करून घेतले. अशा प्रकारे ओटीपी अपलोड केला.
तेव्हा मोबाइलधारकाने एकूण २ लाख ६५ हजर रुपये वेगवेगळ्या खात्यात आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्यात भादंवि ४२० सह आयटी अॅक्ट ६६ (सी) (डी) अन्वये गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा करीत आहेत.
क्लिक करू नका
कोणत्याही फसव्या लिंकवर जाऊ नका अथवा क्लिक करू नका.याबद्दल आम्ही वेळोवेळी आवाहन करीत आहोत, फसले गेल्यानंतर आर्थिक फसवणूक तर होतेच, शिवाय मनस्तापही सहन करावा लागतो. प्रत्येकाने वेळीच दक्षता घ्यावी. -श्रीशैल गजा, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, सोलापूर आयुक्तालय, सोलापूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज