टीम मंगळवेढा टाईम्स।
सुनील शेळके तुम्ही आमदार कोणामुळे झालात, तुमच्या निवडणूक अर्जावर अध्यक्ष म्हणून सही कोणी केली, तुमचा प्रचार कोणी केला, सभा कोणी घेतली, कार्यकर्त्यांना दम देण्यापूर्वी याचा विचार करा.
मी शरद पवार आहे, माझा नाद करू नका, अशा शब्दांत शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांची कानउघाडणी करत त्यांना एकप्रकारे सज्जड दम दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोणावळा शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनील शेळके यांच्या कथित दमदाटीवर बोलताना त्यांच्यावर जोरदार टीका केली.
तसेच या रस्त्याला मी जात नाही; पण वेळ आली तर त्याला सोडत नाही, असा इशाराही त्यांनी आमदार शेळके यांना दिला.
तत्पूर्वी माजी मंत्री मदन बाफना यांनी आपल्या भाषणात बोलताना आमदार सुनील शेळके हे कार्यकर्त्यांना दमदाटी करत असल्याचे सांगत खुद्द मला देखील त्यांनी दम दिल्याचे शरद पवार यांच्यापुढे सांगितले. यावर शरद पवार यांनी आमदार शेळके यांचा समाचार घेतला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज