mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातील शिक्षकाच्या खून प्रकरणी पत्नी,प्रियकरासह चौघांना न्यायालयाने दिली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 11, 2022
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या शिक्षक पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करून गळफास घेतल्याचा बनाव केल्याप्रकरणी पत्नी इंदिरा सत्यवान कांबळे, प्रशांत अशोक पवार ( वय ३२ रा.कुपवाड ता. मिरज )

व त्यांचे साथीदार अजय परशूराम घाडगे ( वय २४ रा . समडोळी ), शाहरूख रफिक शेख ( वय २४ रा . कुपवाड ) या चौघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभे केले असता आठ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत शिक्षक पती सत्यवान कांबळे हा मुळचा रड्डे ता. मंगळवेढा येथील असून तो उमदी येथील डॅफोडिल हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

कांबळे यांचे लग्न शिवणगी येथील इंदिरा हिजबरोबर सन २०१६ मध्ये झाले होते. मयत सत्यवान यास दोन मुले असून तो शिवणगी येथे रहावयास होता.

गेल्या सात दिवसापासून मयत हे रड्डे येथील त्याचे वडीलाकडे शाळा संपल्यानंतर मुक्कामाला येत असल्याने वडिलांनी माझ्याकडे मुक्कामाला का येतोस अशी विचारणा केली असता पत्नी इंदिरा नीट वागत नसून

तीचे अन्य एकासोबत अनैतिक संबंध असल्याने ती माझ्या जीवाचे बरे वाईट करील या भितीने मी इकडे येत असल्याचे त्याने सांगितल्यावर वडिलांनी त्याला समजावून सांगून तुझ्या लहान मुलाकडे बघून घरी जा, असे म्हणाल्याने तो रविवारी संध्याकाळी शिवणगी येथील त्याच्या घरी रहावयास गेला होता.

दि.९ च्या पहाटे ५.३० वा. यातील फिर्यादी तथा मयताचे वडील मच्छिंद्र कांबळे (रा.रड्डे) यांना पुणे येथून भाचा याने फोन करून सत्यवान याने गळफास घेतला आहे तुम्ही घरातील सर्वजण या असे सांगितल्यावर हे शिवणगीला सकाळी ९ .०० च्या

दरम्यान पोहोचले तेव्हा मयत सत्यवान यास घराच्या छताच्या लोखंडी हुकास दोरीने गळफास दिल्याचे निदर्शनास आले.

सत्यवान याचे प्रेताची सुक्ष्म पहाणी केली असता त्याचे तोंडावर, दोन्ही गालावर मारलेले व्रण व नाकातून आलेले रक्त दिसले.

तसेच ओठाखाली, हनुवटीजवळ, पाठीवर, उजवे पायाच्या गुडघ्यावर जखमा दिसून आल्या.त्याचबरोबर फरशीवर रक्त पडलेले व गळफास दिलेल्या दोरीस रक्ताचे डाग दिसून आले.

याबाबत आरोपी तथा पत्नी इंदिरा हिला विचारले असता काही माहित नसल्याचे सांगितले. या सर्व एकंदरीत परिस्थितीवरून अनैतिक संबंधाच्या कारणावरून गळफास देवून मुलगा सत्यवान याचा खून केला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत मयताचे वडील मच्छिंद्र कांबळे यांनी म्हटले आहे.

या घटनेतील चार आरोपींना तपासिक अंमलदार तथा डी.वाय.एस.पी. राजश्री पाटील यांनी अटक करून मंगळवेढा न्यायालयात उभे केले.

यावेळी खूनाच्या तपासात अन्य कोणाचा समावेश आहे का, वाहन जप्त करणे व अन्य मुद्दे न्यायालयासमोर मांडल्यानंतर न्यायालयाने दि .१७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान प्रेमात अडसर ठरलेल्या प्रकरणाचा तपास खून करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे, सहाय्यक फौजदार अशोक बाबर, पोलिस हवालदार दत्तात्रय तोंडले, पोलिस नाईक वंदना अहिरे, सुनिल मोरे, शिवाजी पवार, सुरज देशमुख आदी टिम परिश्रम घेत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलीस कोठडी

संबंधित बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
Next Post
धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

धक्कादायक! मंगळवेढयात लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; तीघांविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..