mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पत्नी व नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नीसह चार जणांविरुद्ध गुन्हा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, क्राईम
पत्नी व नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नीसह चार जणांविरुद्ध गुन्हा


 

सांगोला । प्रतिनिधी पत्नीने बदनामी केल्याने एका तरुणाने आई – वडिलांना उद्देशून चिठ्ठी लिहून विषारी रसायन प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार पुढे आला आहे. सचिन बाळू गावडे ( वय ३० ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.ही घटना बुधवार २ सप्टेंबर रोजी सायं. ५.३० च्या सुमारास वाकी शिवणे येथील सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या पाठीमागे उघडकीस आली आहे.


 

एका महिले बरोवर अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून पत्नी सोडचिठ्ठी देण्याबाबत त्रास देत होती. तसेच नातेवाईकांनी केलेल्या बदनामीला कंटाळून सचिन बाळू गावडे रा.वाकी घेरडी ता.सांगोला याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत मुलाच्या आईने सुनेसह अन्य तीन जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हारुबाई बाळू गावडे रा. वाकी घेरडी ता.सांगोला यांचा मुलगा सचिन बाळू गावडे याची पत्नी पुनम ही वारंवार सचिन याचे एका महिले बरोबर अनैतिक संबंध असल्याचा विनाकारण संशय घेऊन सचिन बरोबर भांडण काढून उलट-सुलट बोलून अपमानित करून त्यास वारंवार सोडचिठ्ठी देण्याबाबत वाद घालून त्रास देत होती. 

तसेच त्यांचे नातेवाईक शत्रुघ्न दादासो लवटे, अलका शत्रुघ्न लवटे व निलाबाई रामचंद्र लवटे सर्व रा.वाकी घेरडी हे हारुबाई गावडे यांचा मुलगा सचिन याचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध आहेत असे पूनमच्या मनात एकसारखे भरवून तिला फूस लावत होते.


 

तसेच त्यांनी इतर नातेवाईकांमध्ये सचिन व महिलेच्या अनैतिक संबंधाबाबत बदनामी केली होती. याचा त्रास सचिनला होत असल्याने तो मानसिक टेन्शनमध्ये होता. वरील त्रासास कंटाळून सचिन याने वाकी शिवणे येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पाठीमागील शिवारातील वनविभागाच्या फॉरेस्टमध्ये जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. 

आत्महत्येपूर्वी सचिन गावडे त्याने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या आहेत. आत्महत्येपूर्वी सचिन याने चिठ्ठीत आई-दादा मला माफ करा, आयुष्यात काही गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या, पण त्यात अपयश आले आज जे मी काही करतोय त्यास माझी बायको पुनम ही जबाबदार असून तिने माझे आयुष्य पूर्णपणे खराब करून टाकले आहे. शत्रुघ्न दादासो लवटे, अलका शत्रुघ्न लवटे, निलाबाई रामचंद्र लवटे हे सगळे यात सामील आहेत असा उल्लेख चिठ्ठीत केला आहे.  

मयत सचिन याच्या मृत्यूस पत्नी पूनम व वरील लोक जबाबदार असल्याबाबत हारुबाई बाळू गावडे यांनी वरील चार जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Sangola waki gherdi Husband commits suicide out of boredom, crime against four including wife;  Sangola

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeSolapur

संबंधित बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

लग्नासाठी मुलाचा फोटो दाखवला, मुलीने होकार न दिल्याने; रागाच्या भरात पित्याने मुलीला केली बेदम मारहाण; पतीसह सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा

January 9, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

भयंकर! सॉफ्टवेअर इंजीनिअरला जुगाराचा नाद…; आर्थिक नुकसान अन् चार्जिंग केबलने फाशी घेत टोकाचं पाऊल

January 8, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बापरे..! आईवरून शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या मित्राचा दगडाने ठेचून केला खून; परिसरात उडाली एकच खळबळ

January 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Breaking! बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; मृताच्या कुटुंबाविरोधातच गुन्हा दाखल

January 5, 2026

मोठी बातमी! वाळू माफियांच्या वकिलावरील हल्ल्यानंतर महिन्याभरातच सोलापूर जिल्ह्यातील पोलिसावर प्राणघातक हल्ला

January 3, 2026
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

मोठी बातमी! विद्यमान आमदारांच्या समर्थकांवर मारहाण व धमकीचा आरोप; माजी उपसभापतींनी पोलीस ठाण्यात दिले निवेदन

December 31, 2025
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026
मंगळवेढ्यात बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळयातील ४५ हजाराचे दागिने पळविले

भुरट्या चोरांची दहशत! मंगळवेढ्यात दिवसाढवळ्या सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून चोरटे फरार

December 30, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

ह्रदयद्रावक! विहिरीतील मोटार काढताना विजेचा धक्का; बाप लेकासह चौघांचा जागीच मृत्यू, गावावर शोककळा

December 28, 2025
Next Post
PM Narendra Modi : पंतप्रधानांना जीवे मारण्याचा एनआयएला मिळाला ई-मेल

PM Narendra Modi : पंतप्रधानांना जीवे मारण्याचा एनआयएला मिळाला ई-मेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

मिनी विधानसभा निवडणुकांचेही ठरले! जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या तारखा जाहीर; ५ फेब्रुवारीला मतदान, निकाल कधी? वाचा वेळापत्रक; एका मतदाराला ‘इतके’ मते देता येणार

January 13, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक समोर; आयोगाची आज पत्रकार परिषद

January 13, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

अभिनव उपक्रम! मोबाईल गेम्स, टी.व्ही. मालिकांच्या प्रभाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावात अभ्यासाचा भोंगा सुरू; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहाटे वाजतो भोंगा

January 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

Breaking! नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी आज विशेष बैठक; ‘ही’ नावे चर्चेत; उपनगराध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष

January 13, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 100 रुग्णांच्या मणका व सांधे बदलीच्या मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

January 12, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

Breaking! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

January 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा