टीम मंगळवेढा टाईम्स ।
पत्नी घरातून निघून गेल्याचा विरह सहन न झाल्याने सासरवाडीत राहत असलेल्या पतीने घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना धायटी ता.सांगोला येथे घडली.महावीर रमेश भोसले असे मृत जावयाचे नाव आहे.
धायटी येथील शशिकांत आत्माराम शिंदे यांची मुलगी मोनाली हिचा महावीर रमेश भोसले (रा. सरड, ता. फलटण ) यांच्याशी १५ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दरम्यान ७ वर्षांपासून मुलगी मोनाली व जावई महावीर भोसले हे शशिकांत शिंदे यांच्याकडे धायटी येथे राहत होते.
दरम्यान ९ मे रोजी पत्नी मोनाली महावीर भोसले ही आत्महत्या घरातून निघून गेल्याने पती महावीर भोसले यांनी सांगोला पोलिसात खबर दिली होती . दरम्यान १२ मे रोजी रात्री ८ वाजता महावीर भोसले हे जेवण करून घरात झोपले होते.
पहाटे ५ च्या सुमारास शशिकांत शिंदे हे झोपेतून पाणी पिण्यासाठी उठले असता त्यांना जावई महावीर भोसले याने घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
आमदारांच्या दारात हलग्या वाजविणार : अतुल खुपसे-पाटील
उजनी हे सोलापूरकरांच्या हक्काचे धरण आहे. या उजनीवर जिल्ह्यातील कुणाचाही अधिकार नाही. बारामतीकरांनी सोलापूर जिल्ह्यावर जाणूनबुजून अन्याय केला आहे . या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जिल्ह्यातील एकही आमदार छातीठोकपणे बोलायला तयार नाही.
म्हणून या आमदारांना जागे करण्यासाठी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने स्थानिक कार्यकर्त्यांना व शेतकऱ्यांना सोबत घेऊन १७ मे रोजी जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या दारात हलग्या वाजवून त्यांना जागे करणार असल्याचे उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे – पाटील यांनी सांगितले.
मंगळवेढा ३५ गाव पाणी संघर्ष समितीच्या वतीने उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची बैठक हुन्नूर ( ता . मंगळवेढा ) येथे आयोजित केली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस सचिव माउली हळणवर , उपाध्यक्ष अॅड . बापूराव मेटकरी , सदस्य धनाजी गडदे , दीपक भोसले , दीपक वाडदेकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना दीपक भोसले म्हणाले की, सोलापूरजिल्ह्यालामंत्रिपदनदेण्यामागे महाविकास आघाडीचे षडयंत्र उघडे पडले आहे ५ टीएमसी पाणी चोरून नेण्याचा निर्णय होईपर्यंत एकालाही माहीत नव्हते. आज माहीत झाले तर कोणी तोंड उघडायला तयार नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज