mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; मंगळवेढ्यातील सासू,सासरा, मेव्हण्या विरोधात गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 3, 2020
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

पोलीस ठाण्यात दाखल केलेली केस मिटवून घेण्यासाठी १० लाख रुपये देण्याचा तगादा लावत पत्नीसह सासरच्या मंडळींनी पतीला व मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली.तसेच पत्नी , सासू , सासरा , मेव्हणा व पत्नीचा मामा यांच्या या त्रासामुळे व सततच्या पैशाच्या मागणीच्या त्रासाला कंटाळून स्वप्नील उत्तम शिरदाळे वय ३६ रा . सरगरवाडी नाझरा ता . सांगोला याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून स्वप्निल यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताची पत्नी पूजा स्वप्निल शिरदाळे,सासू कस्तुराबाई मल्लिकार्जुन बुरकुल, सासरा मल्लिकार्जुन तुकाराम बुरकुल, मेव्हणा तुकाराम मल्लिकार्जून बुरकुल सर्व रा.आंधळगाव ता. मंगळवेढा तसेच पत्नीचा मामा चंदू पाटील रा.धर्मगाव ता . मंगळवेढा यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी , सप्टेंबर २०१८ ते २ नोव्हेंबर २०२० पर्यंत सरगरवाडी , नाझरा ता.सांगोला येथील स्वप्निल उत्तम शिरदाळे यास पत्नी पूजा शिरदाळे , सासू कस्तुराबाई बुरकुल , सासरा मल्लिकार्जुन बुरकुल , मेव्हणा तुकाराम बुरकुल सर्वजण रा . आंधळगाव ता.मंगळवेढा पत्नीचा मामा चंदू पाटील रा.धर्मगाव ता . मंगळवेढा हे वारंवार संगनमत करून स्वप्निल यास धमकी देत होते.

तसेच त्यांनी यापूर्वी दाखल केलेल्या केसेस मिटवून घेण्यासाठी स्वप्नील शिरदाळे याच्याकडे वरील सर्वांनी १० लाख रुपये देण्याचा तगादा लावला होता. तसेच त्यांनी पैसे आण नाहीतर तुला व तुझ्या मुलीला मारून टाकतो असे धमकी दिली होती.

पत्नी , सासू , सासरा , मेव्हणा व पत्नीचा मामा यांच्या शारीरिक , मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून स्वप्नील उत्तम शिरदाळे याने २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्निल याने आईच्या मोबाईलवर माझी बायको पूजा , सासू , सासरा , मेहुणा व बायकोचा मामा चंदू पाटील यांच्या त्रासाला व सततच्या पैशाच्या मागणीमुळे मी आत्महत्या करीत आहे तसेच माझ्या मृत्यूस जबाबदार आहेत असा मेसेज पाठवला. तसेच सदरचा मेसेज त्याने मित्रांच्या मोबाईलवर देखील पाठवला.

याप्रकरणी मयताचा भाऊ प्रकाश शिरदाळे राहणार सरगरवाडी नाझरा यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी स्वप्निल यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी , सासू , सासरा , मेहुणा व पत्नीचा मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पतीची आत्महत्यामंगळवेढासांगोला

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
Next Post
बांधकाम मटेरियल तपासून देण्यासाठी लाच स्वीकारताना महिला अभियंत्यांसह दोघांना रंगेहात पकडले

बांधकाम मटेरियल तपासून देण्यासाठी लाच स्वीकारताना महिला अभियंत्यांसह दोघांना रंगेहात पकडले

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..