सांगोला | बाळासाहेब झिंजुरटे
सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक तसेच एल के पी मल्टीस्टेटचे चेअरमन उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस कार्यक्रम विविध उपक्रमांनी संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नेते व माजी जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर साहेब,
विधान परिषद सदस्य रणजीतसिंह मोहिते पाटील, सांगोल्याचे लोकप्रिय आमदार एड. शहाजीबापू पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते व जिल्ह्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील इत्यादी मान्यवरांनी अनिलभाऊंचे फोनवरून वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.
सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने वाढदिवसानिमित्त सदानंद हॉल सांगोला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकाप चे नेते व पुरोगामी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, खरेदी विक्री संघाचे चेअरमन इंजि.रमेश जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंदभाऊ केदार, समर्थ हॉस्पिटलचे धन्वंतरी डॉ. विजयकुमार इंगवले,
सांगली येथील ब्रम्हा उद्योग समूहाचे चेअरमन मारुती माळी, बजरंग लिगाडे सर, उद्योजक किरणभाऊ पांढरे, उद्योजक महादेव दिघे, संजय साळुंखे, प्रवीण मोहिते, प्रगती पतसंस्थेचे प्रशांत पाटील, आपुलकी प्रतिष्ठान चे राजेंद्र यादव, सुभाष आलदर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सूर्योदय उद्योग समूहाचे सह संस्थापक सर्वश्री डॉ.बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत सर व सुभाष दिघे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्योदय अर्बन , एल के पी मल्टीस्टेट, सूर्योदय दूध विभाग, सूर्योदय मॉल आणि वस्त्रनिकेतन या सर्व संस्थांमधील अधिकारी व कर्मचारी वृंदांच्या सहकार्याने अनिलभाऊंच्या वाढदिवसाचे नेटके नियोजन करण्यात आले होते.
शहर आणि तालुक्यात दिवसभर पावसाची रिमझिम चालू असताना देखील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि युवकांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
तसेच विविध क्षेत्रातील युवा वर्गाने रक्तदानासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्यामुळे दिवसभरात सुमारे 246 रक्तदात्यांनी सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रक्तदान केले. त्याचबरोबर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळ मेडशिंगी व सूर्योदय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मेडशिंगी येथे देखील अनिलभाऊंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये देखील सुमारे 60 रक्तदात्यांनी रक्तदान करत आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या दोन्ही ठिकाणच्या रक्तदान शिबिराचे आयोजनामध्ये रेवनील ब्लड बँक सांगोला यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सूर्योदय उद्योग समूहाची सुमारे 14 वर्षांपासून अनेकविध क्षेत्रांमध्ये दैदिप्यमान वाटचाल सुरू असून या उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या काही वर्षांपासून रक्तदाना सारख्या अनेक लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी या वाढदिवसाच्या निमित्ताने सूर्योदय अर्बन संस्थेच्या वतीने ‘आवर्ती ठेव सप्ताहाचे ‘ आयोजन करण्यात आले असून, काल मान्यवरांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला.
आवर्ती ठेव लखपती योजनेमध्ये या सप्ताह मध्ये सहभागी होणाऱ्या ठेवीदारांना आकर्षक असे चांदीचे नाणे देखील भेट देण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन देखील या निमित्ताने करण्यात येत आहे. विविध उपक्रमांनी संपन्न झालेला हा वाढदिवस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्योदय अर्बन व एलकेपी मल्टीस्टेटचे कर्मचारी वृंद तसेच मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज