mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! आज सर्व दवाखाने राहणार बंद; 24 तास डॉक्टर जाणार संपावर, IMAची देशव्यापी बंदची हाक; संपादरम्यान काय सुरू आणि काय बंद राहणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 17, 2024
in आरोग्य, राष्ट्रीय
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोलकात्यात आरजी कर मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने(IMA) आज 17 ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.

तसेच आयएमएने रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. तसेच आजपासून देशभरातील डॉक्टरांकडून आंदोलन तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहे.

आयएमएने एक पत्रक काढून आज 17 ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा आज 17 ऑगस्ट सकाळी 6 ते 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

तब्बल 24 तास सेवा बंद राहणार आहे. या दरम्यान अत्यावश्यत सेवा सुरू राहणार आहे. आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूतीसेवाही सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केलं आहे. अत्यावश्यक आरोग्य सेवा, अतिदक्षता कक्ष, सीसीयू, अत्यावश्यक शस्रक्रिया सुरु राहणार आहेत.

24 तासांत खासगी रूग्णालयांमध्ये केवळ आपत्कालीन सेवाच सुरू

आज शनिवारी सकाळी 6 ते रविवारी सकाळी 6 या 24 तासांत फक्त खासगी रूग्णालयांमध्ये केवळ आपत्कालीन सेवाच सुरू राहणार असल्याची माहिती आयएमएने दिली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन एकजुटीने या संपामध्ये उतरणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा आणला पाहिजे. जवळपास 25 राज्यांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदे असले, तरी ते त्याची अंमबजावणी होताना दिसत नाही. हॉस्पिटलमध्ये 50 टक्के महिला डॉक्टर असतील तर महिलांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.

बलात्कार हत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे

कोलकात्यात आरजी कर मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवरील बलात्कार हत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आलाय. हायकोर्टाने हा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले होते. सध्या कोलकाता शहरात तणावाची स्थिती आहे.

पीडित महिला डॉक्टरच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा

बलात्कारानंतर हत्या करण्यात आलेल्या महिला डॉक्टरचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा केला जातोय. मृत डॉक्टरशी अनेकवेळा बळजबरीने शरीससंबंध ठेवण्यात आल्याचा दावा केला जातोय. पहाटे 3 ते 5 वाजेदरम्यान महिलेसोबत हा प्रकार घडला आहे.

बलात्कार पीडित महिला डॉक्टरच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. या महिलेच्या ओठांवर, नाकावर, गाल, जबडा तसेच शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. या डॉक्टरच्या डोक्यालाही मार आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार पीडित डॉक्टरचे तोंड बंद करण्यात आले होते.

संपादरम्यान काय सुरू आणि काय बंद?

रुग्णालयातील बहुतांश विभाग बंद राहतील
नियमित बाह्यरुग्ण विभाग (OPD) आणि वैकल्पिक शस्त्रक्रिया बंद राहतील

आपत्कालीन काळजी (emergency care) आणि गंभीर उपचारांसह (critical treatments) अत्यावश्यक सेवा चालू राहतील

कोणत्याही तातडीच्या वैद्यकीय गरजा (Essential services) पूर्ण करण्यासाठी अपघाती सेवा कार्यरत असतील
या संपाचा परिणाम सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयातील सर्व भागांवर होईल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डॉक्टर संप

संबंधित बातम्या

मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

करारा जवाब मिलेगा! भारत सरकारनं आखली मोठी योजना; डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा सामना करण्यासाठी खेळी

August 28, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी, ‘या’ अटी-शर्ती पाळाव्या लागणार; नियम नेमके काय?

August 27, 2025
काळजी घ्या! मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा चोविसावा बळी; 46 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

दोन महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली; गॅसच्या स्फोटात जखमी झालेल्या मंगळवेढ्यातील ‘त्या’ महिलेचा मृत्यू

August 24, 2025
शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन

नागरिकांनो! आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मंगळवेढ्यात आज रानभाजी महोत्सवाचे आयोजन; कुठलेही रासायनिक औषधे न वापरलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री

August 21, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातल्या जनतेला मोठं गिफ्ट, मंत्रिमंडळ बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय; राज्यातील ‘या’ विभागाचा चेहरामोहरा बदलणार

August 20, 2025
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! वैद्यकीय पदवी नसताना उपचार; दोन बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल; तालुका आरोग्य विभागाची कारवाई

August 18, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

August 16, 2025
Good News! मंगळवेढा शहरात ‘सिटी स्कॅन’ सेंटर सुरू; अत्यंत माफक दरात मिळणार सेवा

नागरिकांनो! मंगळवेढा शहरात निदान हायटेक ‘सिटी स्कॅन’ सेंटर आजपासून सुरू होणार; स्कॅनचा रिपोर्ट त्वरित व्हाट्सअँपवर मिळणार

August 15, 2025
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

सोनेप्रेमींचे टेन्शन वाढणार! दागिने खरेदी करायचंय? मग आत्ताच करा; भविष्यातील संकेत पाहूनच धडकी भरेल…

August 15, 2025
Next Post
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

मोठी बातमी! हरयाणा, जम्मू-काश्मीरची विधानसभा निवडणूक अखेर जाहीर; कलम ३७० हटवल्यानंतर होणार पहिलीच निवडणूक; महाराष्ट्र विधानसभेची मुदत कधीपर्यंत?

ताज्या बातम्या

आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

मोठी बातमी! मराठा आंदोलकांच्या जोरदार घोषणा, तरुणांना पाहून जरांगे संतापले; दिला ‘हा’ मोठा आदेश

August 29, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

नागरिकांनो! शेळीपालन, झेरॉक्स मशीन, पिठाची गिरणी, शिलाई मशीन हवी आहे, तर आजच मंगळवेढा पंचायत समितीकडे करा अर्ज

August 29, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

शॉकिंग! भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेऊन नवऱ्यानेच बायकोला संपवलं; हत्याकांडाने ‘हा’ जिल्हा हादरला

August 29, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

आरक्षण घेऊनच जाणार! डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचं नाही, तोपर्यंत मुंबई सोडायाची नाही; आझाद मैदानावर पोहचताच मनोज जरांगे आक्रमक

August 29, 2025
आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

August 29, 2025
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

क्यूआर स्कॅन करून देता येणार अवैध धंद्याची माहिती; थेट टेलिग्रामवर होणार संपर्क, ‘या’  पोलिसांचा उपक्रम

August 29, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा