मंगळवेढा टाईम्स टीम । मरवडे येथील छत्रपती परिवाराने गेल्या 25 वर्षात अनेक विधायक उपक्रम राबवून युवा पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.कोरोना कालावधीत जीवाची बाजी लावून सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करुन सामाजिक बांधिलकी जपल्याचे गौरवोद्गार जि. प. सदस्य नितीन नकाते यांनी काढले.
मरवडे येथे शिवराज्याभिषेक दिनी कोविड योद्ध्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. मरवडे येथे सालाबाद प्रमाणे अत्यंत उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी चौकातील अश्वारुढ पुतळ्यास युवकनेते धन्यकुमार पाटील व ग्रा.पं. सदस्य अशोकराव जाधव यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला.
यावेळी थार्मिक विधीचे संचलन सचिन कुलकर्णी यांनी केले तर ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्राचे पठण बाळासाहेब कदम यांनी केले.
त्यानंतर मरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना कालावधीत महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी, शिक्षक , आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी अशा 33 जणांचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन जि.प. सदस्य नितीन नकाते यांच्या हस्ते फेटा, शाल ,श्रीफळ , पुष्पहार व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा दामाजी शुगरचे माजी चेअरमन अॅड.नंदकुमार पवार हे होते.
यावेळी व्यासपीठावर डाॅ. माणिकराव पवार डाॅ भिमराव पडवले, युवक नेते धन्यकुमार पाटील, माजी सरपंच दादासाहेब पवार, बाळासाहेब बनसोडे शिवाजीराव पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अशोकराव जाधव, संजय पवार,सौ. दिपाली ऐवले, सौ.मालन मणेरी, अल्लाबकक्ष इनामदार ,अमीर मणेरी, मेजर राहुल शिंदे,सिद्धेश्वर रोंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांनी प्रास्ताविकातून कोरोना कालावधीत या सर्व कर्मचाऱ्यांनी दिलेले योगदान संस्मरणीय असून सामाजिक जाणिवेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात अँड पवार यांनी कोरोनामुळे जीवलग व्यक्तीदेखील दुरावल्या असून अनेक कुटुंबे उघड्यावर पडली असून अशा कुटुंबांच्या मदतीसाठी छत्रपती परिवारासारख्या सामाजिक चळवळी गावोगावी रुजाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी डाॅ. भिमराव पडवले, श्रीमती मेघा गायकवाड यांनी सत्कारमूर्तींच्या वतीने मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. संतोष पवार यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज