मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच (फिरते खंडपीठ) १८ ऑगस्ट २०२५ पासून कोल्हापुरात सुरू होणार आहे. हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी शुक्रवारी याबाबतची अधिसूचना प्रकाशित केली.
त्यानुसार कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या ६ जिल्ह्यासाठी हे खंडपीठ उपलब्ध होणार असून त्यांना मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही.
सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद, नागपूर, गोवा येथे खंडपीठ आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील खटल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या भागातही एखादे खंडपीठ सुरू करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती.
त्यासाठी कोल्हापूर व सोलापूर या दोन जिल्ह्यांमध्ये स्पर्धा लागली होती. दोन्ही जिल्ह्यातील वकिलांनी मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला.
अधिसूचनेत काय म्हटले?
हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे कामकाज १८ ऑगस्ट २०२५ पासून अधिकृतपणे सुरू होईल. या सहा जिल्ह्यांतील दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे या खंडपीठात चालवली जातील.
सर्किट बेंच हे ठराविक काळापुरते खंडपीठ
खंडपीठ हे कायमस्वरुपी असते, तर सर्किट बेंच हे तात्पुरते असते. उच्च न्यायालयातील दोन किंवा तीन न्यायाधिशांचे पॅनल नियुक्त केलेले असते. हे पॅनल ठराविक कालावधीच्या अंतराने सर्किट बॅचमध्ये खटल्यांची सुनावणी घेतात. त्यानुसार कोल्हापूरला तूर्त काही ठराविक काळासाठी हायकोर्ट असेल. मात्र कालांतराने हे पूर्णवेळ खंडपीठ होऊ शकते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज