mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! मंगळवेढा शहरात निदान हायटेक ‘सिटी स्कॅन’ सेंटर आजपासून सुरू होणार; स्कॅनचा रिपोर्ट त्वरित व्हाट्सअँपवर मिळणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 15, 2025
in आरोग्य, मंगळवेढा
Good News! मंगळवेढा शहरात ‘सिटी स्कॅन’ सेंटर सुरू; अत्यंत माफक दरात मिळणार सेवा

मंगळवेढा टाईम्स न्युज ।

मंगळवेढा शहरात अण्णाभाऊ साठेनगर समोर पंढरपूर-विजापूर रोड येथे आज शुक्रवार दि.15 ऑगस्टपासून ‘निदान हायटेक सिटी स्कॅन’ सेंटर सुरू होणार असून नागरिकांना अत्यंत माफक दरात सर्व प्रकारचे स्कॅन काढून मिळणार असल्याची माहिती संचालक डॉ.दत्तात्रय घोडके यांनी दिली आहे.

आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, पक्षनेते अजित जगताप, कृषिराज परिवाराचे युवराज शिंदे, माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुलोचना जानकर,

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भाऊसाहेब जानकर, ‘आय.एम.ए’चे अध्यक्ष डॉ.मधुकर कुंभारे, निमाचे अध्यक्ष डॉ.सुभाष देशमुख, होमिओपॅथी अध्यक्ष डॉ.शाकीर सय्यद व डेंटल असोसिएशन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत.

निदान हायटेक सिटीस्कॅन सेंटरचे वैशिष्ट्ये

डॉक्टर घोडके हे स्वतः रेडिओलॉजिस्ट असल्यामुळे झालेल्या स्कॅनचा रिपोर्ट हा तात्काळ पेशंटला व पाठवणाऱ्या डॉक्टरांना लगेच तात्काळ मिळणार आहे त्यामुळे पेशंटला लवकरात लवकर ट्रिटमेंट चालू होऊन त्याचे उपचार होऊ शकतात.

तसेच या सेंटरमध्ये ऍडव्हान्स सुविधा जसे की झालेला रिपोर्ट हा एसएमएस द्वारे तसेच व्हाट्सअप द्वारे पेशंट पेशंटच्या नातेवाईकांना किंवा डॉक्टरांना लगेच पाठवला जाणार आहे.

मंगळवेढा शहरात प्रथमच ‘सिटी स्कॅन’ सुरू झाल्याने नागरिकांना पंढरपूर, सोलापूरला जायची आवश्यक आता भासणार नाही इतरत्र जाणाऱ्या नागरिकांना व रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

मेंदूच्या आजारासह मान, मणका, छाती, ओटीपोट, पोट आदी भागांमधील आजारांच्या निदानासाठी सीटी स्कॅनद्वारे तपासणी केली जाते.

सीटी स्कॅन ही प्रणाली येण्यापूर्वी लक्षणांवरून केलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान नेमका आजार कोणता आहे, याचे निदान होत असे. सीटी स्कॅन तंत्रप्रणालीमुळे मात्र आता शरीरातील प्रत्येक अवयवाचे अंतर्परीक्षण करणे सोपे झाल्याने आजारांचे निदान वेळेत करणे शक्य झाले आहे.

सीटी स्कॅन किंवा मॅग्नेटिक रिझोन्स इमेजिंग (एमआरआय) या दोन्ही तंत्रप्रणालीचे बाह्य़स्वरूप आणि त्यातून मिळणारी छायाचित्रे यामध्ये साम्य असले तरी या दोन्ही तंत्रप्रणाली भिन्न आहेत.

सीटी स्कॅनमध्ये मेंदूच्या प्रत्येक भागात क्ष-किरण सोडले जाऊन मेंदूची रचना आणि त्यामध्ये होणारे बदल याचा अभ्यास केला जातो.

सीटी स्कॅन ही स्वस्त आणि जलद प्रणाली आहे. मेंदूच्या सीटी स्कॅनसाठी एका मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो, तसेच रुग्णाची प्रकृती गंभीर असली तरी सीटी स्कॅन करणे शक्य आहे. त्यामुळे अत्यंत तातडीच्या वेळेस डोक्याची दुखापत किंवा आकडी, मेंदूला रक्तप्रवाह न होणे, ब्रेन हॅमरेज अशा स्थितीमध्ये त्वरित सीटी स्कॅनची तपासणी करून पुढील उपचार केले जातात.

शरीरातील ‘या’ अवयवचा होतो सीटी स्कॅन

किडनीची अँजिओग्राफी (Renal Angiography), फुफुसाचे सिटी स्कॅन (HRCT) तपासणी याचबरोबर मेंदूसाठी (CT Brain) , छातीसाठी ( CT Chest), पोटासाठी ( CT Abdomen) , शरीरातील मांस पेशींसाठी ( Soft Tissue CT) ,

मानेसाठी ( CT Neck) ,मणक्यांसाठी (CT Spine), मेंदूचे हाड (Temporal Bone) ,डोके, मेंदू, नाकाभोवतीचा भाग, श्रवणेंद्रिय असलेली हाडे, मान, सर्व सांधे, सर्व टोकाचे भाग (एक्सट्रीमिटीग), फुप्फुसाची अँजिओग्राफी त्याचबरोबर सर्व स्कॅन थ्री-डी मध्ये उपलब्ध सेवा आहेत.

नागरिकांसाठी व रुग्णांसाठी हेल्पलाईन नंबर

सिटी स्कॅन संदर्भात रुग्णांनी अथवा नागरिकांनी मदतीसाठी 8999461515 या हेल्पलाईन क्रमाकांशी संपर्क साधावा.

आज होणाऱ्या निदान हायटेक सिटी स्कॅन सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थिती राहावे असे आवाहन डॉ.आसावरी घोडके यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: निदान सिटी स्कॅन सेंटर

संबंधित बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
Next Post
ग्रँड ओपनिंग! असंख्य व्हरायटी व भरपूर डिस्काउंटसोबत 15 ऑगस्टपासून एस.एम खटावकर मॉल धुमाकूळ घालणार; सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची असणार प्रमुख उपस्थिती

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा संपली! असंख्य व्हरायटी व भरपूर डिस्काउंटसोबत आजपासून 'एस.एम खटावकर मॉल' ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार; अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 6 वाजता येणार

ताज्या बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा