टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा-पंढरपूर मार्गावर कमान उभी करुनही शहरातून अवजड वाहनांची ये जा सुरुच असल्याचे वृत्त छापून येताच याची दखल डी. वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड व
पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी घेवून शहराच्या बाह्य वळनाने वाहतूक वळविल्याने नागरिकामधून समाधान व्यक्त होत आहे.
मंगळवेढा-पंढरपूर मार्गावर व मरवडे मार्गावरील उड्डाण पुलाजवळ शहरात अवजड वाहने येवू नयेत यासाठी साडे चार मिटर उंचीची नगरपालिकेने कमान व अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंद असे फलक
लावण्यात आले असतानाही शहरातून अवजड वाहनांची ये जा सुरु असल्याने पालक वर्गातून अवजड वाहनाबाबत असंतोष पसरला होता.
याबाबतचे वृत्त छापून येताच याची दखल घेवून डी.वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी
सचिन काळे व सुरज साळुंखे यांनी दिवसभर खडा पहारा करुन कर्नाटक राज्यातून पंढरपूरकडे जाणारी सर्व वाहने शहरा लगत असलेल्या बायपास रोडने वळविल्याने शहरवासीयांनी मोकळा श्वास घेतला.
अवजड वाहनामुळे शालेय मुलांना जीव मुठीत घेवून दामाजी चौकातील रस्ता ओलांडावा लागत होता. परिणामी आता अवजड वाहतूक बंद झाल्यामुळे हा गंभीर प्रश्न कायमस्वरुपी सुटला असून
शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होते आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ वाहने शहरात येणे बंद केल्यामुळे पोलीस प्रशासनास नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज