मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
अतिवृष्टीमुळे मंगळवेढा तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, नागरिकांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
येत्या १२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान हुन्नूर येथे विरोबा-महालिंगरायाची यात्रा होत आहे. या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर राज्यांमधून हजारो भाविक उपस्थित राहतात.
त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील चार साखर कारखान्यांचा ऊस हंगामही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे केवळ शेती पिकांचेच नव्हे, तर तालुक्यातील प्रमुख रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत.
नव्याने ओढे निर्माण झाले आहेत. रस्त्यावर खड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन अपघातांच्या घटनाही वाढल्या आहेत. या रस्त्यांवर खड्डे, तुटलेले पूल आणि ओढे निर्माण झाल्याने प्रवास धोकादायक झाला आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर आणि ऊस वाहतुकीच्या हंगामामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हे सर्व रस्ते त्वरित दुरुस्त करून सुरक्षित करावेत, अशी मागणी नागरिकांनी झेडपी बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष अॅड. राहुल घुले, अॅड. रविकिरण कोळेकर, भागवत जाधव, नाथा ऐवळे, निसार पाटील, शहाजहान पटेल, अभिमन्यू बेदरे, राजन ठेंगील, लक्ष्मण अवघडे, सुकदेव डोरले, नामदेव हेबाडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यातील हे रस्ते खराब आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव-लक्ष्मी दहिवडी रस्ता, निंबोणी गावाजवळील खड्डा, हुन्नूर-भोसे रस्ता, भोसे चौकातील पूल, नंदेश्वर ओढ्यावरील पूल, नंदेश्वर-शिरनांदगी, हुन्नूर-लोणार, महमदाबाद हुन्नूर-पडोळकरवाडी,
घाडगे कलेक्शन ते सोलापूर बायपास रोड, हाजापूर-शिरनांदगी, रड्डे-नंदेश्वर, रड्डे-चिक्कलगी, मरबडे-तळसंगी, राहटेवाडी-बोराळे, डोणज-मरवडे, जालीहाळ-भाळवणी, मंगळवेढा-जुना मारापूर, ब्रह्मपुरी-बठाण, ब्रह्मपुरी-मुंढेवाडी या रस्त्यांचा समावेश आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज