मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
राज्यात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून राज्य सरकारने 32 हजार कोटींचं पॅकेजही जाहीर केलं आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यावर मदतीची रक्कम देण्यात येईल, असे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यानुसार, काही मदतीची रक्कम जमा होण्यासही सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी न भुतो न भविष्यती आंदोलन
त्याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटी यांनी आता शेतकऱ्यांसाठी न भुतो न भविष्यती आंदोलन उभारण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच, शेती नुकसानीच्या पंचनाम्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारला 15 दिवसांचा वेळ जरांगेपाटलांकडून देण्यात आला आहे.
कुणबी प्रमाणपत्र वितरीत झाल्याशिवाय कोणतीही नोकर भरती नको
मात्र, कुणबी प्रमाणपत्र वितरीत झाल्याशिवाय कोणतीही नोकर भरती घेऊ नका, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
शेतकरी हा महत्वाचाघटक असून आम्ही शेतकऱ्यांचीलेकरंआहोत. त्यामुळे, अतिवृष्टीनेझालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सरकारला 15 दिवसांचा अवधी देण्यात येत आहे.
मात्र, कुणबी प्रमाणपत्र वितरीत झाल्याशिवाय कोणतीही नोकर भरती घेऊ नका, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील डिकसळ येथे आले जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत पुढील दिशा स्पष्ट केली.
दरम्यान, राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत 2 सप्टेंबर रोजी कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातील शासन आदेश जारी केला. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे हा शासन निर्णय झाल्याने मराठवाड्यातीलकुणबींनाओबीसीतून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर आता जरांगे पाटील शेतकरी प्रश्नावर बैठक घेणार आहेत. दिवाळीनंतर या बैठकांचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या 100 वर्षात शेती प्रश्नावर उभारले नाही असे आंदोलन उभं करण्याचा निर्धार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी चांगला निर्णय घेतला, फडणवीसांचे कौतुक करत दिलेला शब्द पाळा ही विनंतीही जरांगे पाटील यांनी आरक्षण कुणबी प्रमाणपत्र वाटपावरुन केली आहे.
मुंडक्यावर पाय द्यावा लागेल – पाटील
मनोज जरांगे पाटील आता मराठा आरक्षणनंतर शेती प्रश्नावर लढा उभारणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिवाळी झाल्यावर राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलन उभारणार असल्याची घोषणा पाटील यांनी केली.
असं आंदोलन उभा करावं लागेल की इथून पुढे अन् इथून मागे 100 वर्षात अस आंदोलन कोणी केल नसेल, तेव्हाचशेतकऱ्याच्या मागण्या मान्य करुघ्याव्या लागतील. मुंडक्यावरच पाय द्यावा लागेल, नुसतं वावरात फिरल्याने, भाषण केल्याने, चिखलात फिरल्याने शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झालेला संसार भरुन निघणार नाही.
शेतकऱ्याच्यापिकाला चांगला भाव द्यायचा असेल, कर्जमुक्ती करायची असेल, नुकसानीची शंकर टक्के भरपाई द्यायची असेल तर ताकतीने आंदोलन लावून धरावं लागणार आहे, त्यासाठी मी प्रयत्न करतोय, असेही पाटील यांनी म्हटले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज