टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानात मधुमेह मुक्त महाराष्ट्र हा प्रकल्प हाती घेतला आहे.
मधुमेह मुक्त राज्य करण्यासाठी लागणारी उच्चप्रतीची औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि पायाभूत सुविधा डेन्मार्क शासनाच्या मदतीने करणार असल्याचे सांगत डेन्मार्काचे भारतीय राजदूत फ्रेडी स्वान यांच्याशी प्राथमिक स्तरावर चर्चा केली.
पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये महाराष्ट्र राज्य आणि डेन्मार्क सरकार यांच्यात एक सामंजस्य करार होऊन या तीनही क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत, असे मंत्री सावंत यांनी सांगितले.
या चर्चेत पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये या संबंधित महाराष्ट्र राज्य आणि डेन्मार्क सरकार यांच्यात सामंजस्य करार होणार आहे.
आपल्या सोबत डेन्मार्क सरकारने उच्च प्रतीची औषधे, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि पायाभूत सुविधांसाठी देवाणघेवाण करावी अशा आशयाची चर्चा झाली.
बैठकीत डेन्मार्कचे भारतीय राजदूत फ्रेडी स्वान, डेन्मार्कचे उद्योग मंत्री सोरेन कैनिक, करकेडा, आनंद त्रिपाठी, रुलर डिजिटल हेल्थ अँड फायनान्सचे डॉ.सतिश तागडे यांच्या शिष्टमंडळाशी
महाराष्ट्र राज्यात दोन महिन्यात झालेल्या चार कोटी महिलांच्या आरोग्य तपासणीत आढळून आलेल्या विविध आजारांविषयी सविस्तर चर्चा झाली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज