टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षेबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील कोरोनाला हरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यामध्ये राज्यात संपूर्ण लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात संपूर्ण लाॅकडाऊन करावा, अशी मागणी कॅबिनेट मंत्र्यांनी बैठकीत केली.
राज्यात संपूर्ण लाॅकडाऊन करावा, अशी मागणी कॅबिनेट मंत्र्यांनी बैठकीत केली.
सध्याच्या निर्बंधांमुळे काहीच फरक पडत नसल्याने, आता संपूर्ण लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नाही, असं मंत्र्यांनी बैठकीत सांगितले आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी राजेश टोपे यांनी माहिती दिली.
दरम्यान, राज्यात संचारबंदी करुन त्याचा फायदा सध्या हवा तसा होताना दिसत नाही. आपण लॉकडाऊन केलेला नाही, अनेक व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध होता.
पण आज व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे, तसेच इतर लहान दुकानदारही लॉकडाऊन 100 टक्के व्हावा, अशी मागणी करत असल्याचं टोपे म्हणाले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज