टीम मंगळवेढा टाईम्स ।
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत व शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी परांडा मतदार संघात घेतलेल्या महा आरोग्य शिबीराची इन्टरनॅशनल करण्यात येईल. वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असुन
इन्टरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सावंत बंधूंना रविवारी ता.२६ मार्च ला सकाळी अकरा अंधेरी वेस्ट चित्रकुट मैदान येथे सन्मानित करण्यात येणार आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सह विविध बॉलिवुड क्षेत्रामधील सेलिब्रिटी च्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल
महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून तीन लाख सात हजार रुग्णांची तपासणी व उपचार केल्याबद्दल शिबीराची दखल घेण्यात आली आहे.
प्रा.सावंत बंधूंनी जगातील सर्वात मोठे आरोग्य शिबीर घेतल्याचे रेकॉर्ड केले आहे. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबीरात तीन लाख सात हजार रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
यासाठी १ हजार ८०० डॉक्टरांनी रुग्णसेवेचे काम करुन औषध उपचार केले. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतुन परांडा शहरात गफार शहा कोटला मैदानात आयोजित केलेल्या शिबीरात भूम, परांडा मतदार संघातील लाखो गोरगरिब रुग्णांनी विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेतला होता.
शिबीरात देशासह विदेशातील नामांकित डॉक्टरांनी सहभाग नोंदवुन रुग्णांच्या तपासण्या करुन औषध उपचार करण्यात आलेत. या सर्व बाबीची दखल घेऊन
प्रा. सावंत बंधुच्या महाआरोग्य शिबीराचे इन्टरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड झाले असून इन्टरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून या कार्यक्रमास बॉलिवुडमधील अनेक अभिनेते, अभिनेत्री उपस्थित राहणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज