मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर शहरातून एक अतिशय धक्कादायक बातमीसमोर आली आहे. सोलापुरात डीजेच्या तालावर नाचून थकलेल्या तरुणाचा चक्क हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अभिषेक बिराजदार असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खळबळजनक घटनेनंतर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सदर घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
मात्र या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनं परिसरात शोकव्यक्त केला जात आहे.
मिरवणुकीत नाचून दमला, छातीत दुखल्याने जागीच कोसळला
पुढे आलेल्या माहितीनुसार, अभिषेक बिराजदार या तरुणाचा मृत्यूच्या काही क्षणा अगोदरचा डीजेवर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
यात मिरवणुकीत नाचून दमलेला तरुण काहीक्षण बाजूला थांबला आणि छातीत दुखल्याने जागीच कोसळला.
त्यांनतर बेशुद्धावस्थेत त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
यानिमित्ताने सोलापुरातील तासनतास चालणाऱ्या मिरवणूक आणि त्यातील कर्णकरकश्य डीजेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.(स्रोत:पुढारी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज