टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील महिला तलाठ्यांनी एकत्र येत रूढी परंपरेची बंधनं झुगारून, कोरोनात वैधव्य आलेल्या महिलांना हळदी-कुंकवाचा सुवासिनीचा मान देत तिळगुळाबरोबर संक्रांतीच्या वाणाचा मान दिला. त्याचबरोबर शहीद जवानांच्या वीर पत्नींचा सन्मान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
महिला तलाठी जयश्री कल्लाळे, वंदना गुप्ता, प्रणाली भितकर, दीपा पवार, प्राजक्ता गवळी, गीतांजली येणपे, मंडल अधिकारी शामबाला कुंभार यांनी विधवांना हळदी-कुंकवाचा सुवासिनीचा मान दिला.
यावेळी महिलांना एक रोप, श्यामची आई पुस्तक वाटप करून तिळगुळाचे वाटप केले. या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या महिलांच्या चेहऱ्यावर जोडीदार सोडून गेल्याचं दुःख होतेच त्या आडून सन्मान मिळाल्याचा आनंद पण होता.
अनेक महिला कित्येक दिवसांनंतर या अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
यावेळी वीरपत्नी सविता ठोंबरे,
लक्ष्मी पवार, शामल माने, कविता म्हेत्रे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला बालकल्याण समिती सदस्या अॅड.सुवर्णा कोकरे या होत्या.
यावेळी अॅड. रोहिणी पवार, महिला अत्याचार विरोधी समितीचे शुभांगी सूर्यवंशी, कल्पना देशमुखे, माधुरी गवळी, मंजुषा सुळकुंडे, नंदा पाटील, लतिका घोडके, लक्ष्मी लाड, सरोजिनी कोळी उपस्थित होते.
चुकीच्या परंपरेला तिलांजली देण्यात आली
विधवांना न्याय देण्यासाठी निर्धारपूर्वक हा हळदी- कुंकवाचा कार्यक्रम घेतला आणि एका चुकीच्या परंपरेला तिलांजली देण्यात आली. या कार्यक्रमाचा महिलांमधून स्वागत झाले.- जयश्री कल्लाळे, संयोजक
आमच्यातही वेगळे धाडस निर्माण झालं
अपघाताने आमच्या वाट्याला आलेल्या या विधवापणामुळे आम्हाला सार्वजनिक कार्यक्रमात देखील सहभागी होण्याचा अधिकार दिला जात नाही. यामुळे आमची प्रचंड प्रमाणात घुसमट होते, अशा कार्यक्रमामधून आमच्यातही वेगळे धाडस निर्माण झालं आणि आनंद वाटतो आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी आयोजित करण्यात आलेल्या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात महिलांनी व्यासपीठावर बोलून दाखवली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज