टीम मंगळवेढा टाईम्स।
आज्जीच्या मदतीला गेलेल्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी
प्रविण युवराज थोरात वय 19 (रा.हाजापूर ता.मंगळवेढा) याला पोलिसांनी अटक करून माळशिरस न्यायालयात उभे केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील पिडीत मुलगी ही मंगळवेढा शहरात एका हायस्कूलमध्ये दहावी इयत्तेत शिकत असून
फिर्यादीची आज्जी हिची देखभाल करण्यासाठी शाळेला सुट्टी असल्याने सकाळी 9.30 वाजता निंबोणी येथे पाठविले होते.
आज्जी शेतात बाजरी काढण्यासाठी गेल्यावर आरोपीने सदर पिडीतेस लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली होती.
तपासिक अंमलदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुशराव वाघमोडे हे तपास करीत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांना सदर आरोपी हा पुणे येथे असल्याची गोपनीय माहिती मिळताच
त्यांनी तेथे जावून आरोपीस व पिडीत मुलीस ताब्यात घेवून मंगळवेढा पोलिस स्टेशनमध्ये हजर केले.
आरोपी प्रविण थोरात यास अटक करून माळशिरस न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दि.27 पर्यंत पोलिस कोठडी दिली असून आरोपीची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
दरम्यान पिडीत मुलीस तपास अधिकार्यांच्या मदतीने महिला पोलिस कविता सावंत यांनी तिला सोलापूर येथील बालगृहात नेवून दाखल केले आहे.
दरम्यान पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात 376 (2) कलम वाढवले आहे. यापुर्वी कलम 363, 366 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल होता.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज