टीम मंगळवेढा टाईम्स ।
धनगर समाजाचे आराध्य दैवत महालिंगराया व बिरोबा या गुरु-शिष्य भेटीचा सोहळा ५ लाख भाविकांनी मोठ्या गजरात व जयघोषाने लोकर व भंडाऱ्यांची उधळण करत काल शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास मंदिराच्या लगत असणाऱ्या ओढ्यात हुलजंती येथे मोठ्या उत्साहात गुरु-शिष्याच्या भेटीचा सोहळा पार पडला.
या सोहळ्यासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र या राज्यातून भाविक आले होते. हुन्नूरचा बिरोबा वहुलजंतीचा महालिंगराया यांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी ५ लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती.
या भेटीदरम्यान भाविकांनी भंडारा व लोकराची मनसोक्त उधळण केली. चडचण, सोड्डी, मंगळवेढा मार्गावर वाहने व भाविकांची मोठी गर्दी होती. काल शुक्रवारी दुपारी ४ वाजता भेटीचा सोहळा झाला.
पाऊस चांगला झाल्यामुळे व मंदिराच्या परिसरातील ओढ्यात ज्या ठिकाणी पालखी भेट होते त्याठिकाणी बंधाऱ्यामुळे पाणी उपलब्ध होते मात्र, ओढ्याच्या लगतच्या बाजूला दलदल मजल्याने भाविकांना त्रास झाला.
हुन्नुरचा बिरोबा, सोन्याळचा विठोबा, उटगीचा ब्रम्हदेव, जिराअंकलगीचा बिर्राप्पा शिराढोणची शिलवंती, हुलजंतीचा महालिंगराया, शिराढोणचा बिरोबा महालिंगरायाचा नातू कसगी येथील बगलीसिध्द या पालख्यांची भेट झाली.
यात्रेच्या तीन दिवसात काळात जवळपास ७ लाख भाविकांनी दर्शन घेतले. गुरुवारी रात्री ध्वज लागण्याचा विधी झाला. या वर्षी मुंडास १० शिखरपैकी गर्भ शिखर व ६ अशा एकूण शिखराच्या ७ ही कळसाच्या चारी बाजूला समान सोडलेले आहे.
त्यामुळे देशभरात पीक पाणी चांगले राहील अशी अपेक्षा पुजाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सोहळ्यासाठी कर्नाटकातील जीप गाड्यांची संख्या इतकी प्रचंड होती, त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. शिवाय यात्रेत गांजा, दारुचा अवैध धंदेही सुरु होते.
पाऊस चांगला, राजकारणात संघर्ष होण्याची भाकणूक
यात्रेत भाकणूक झाली. उत्तर भारतात अराजकता माजेल, राजकारणाकडे दुर्लक्ष करा, कारण संघर्ष होईल, येत्या पोर्णिमेच्या आसपास व येत्या वर्षात पाऊस चांगला पडेल, मात्र कडधान्यमहाग होतील,
देशी जनावरे महाग होणार, खिलार गाई-बैल प्रचंड महागणार, तर शेळ्या मेंढ्या चांगले दिवस येणार, बैलांची संख्या कमी होणार अशी भाकणूक यात्रेत झाल्याची माहिती महालिंगरायाचे पुजारी यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज