टीम मंगळवेढा टाइम्स ।
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गुरुवारी रात्री सोलापुरात मुक्काम करणार आहेत.
शुक्रवारी, २६ जानेवारी रोजी पोलिस मुख्यालयात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. शनिवारी, २७ जानेवारी दुपारी १ वाजता शासकीय वाहनाने ते पुण्याकडे रवाना होणार आहेत.
गुरुवारी, सायंकाळी पाच वाजता पुणे येथून शासकीय वाहनाने पालकमंत्री पाटील हे सोलापूरकडे रवाना होणार आहेत.
रात्री ९ वाजता त्यांचे सोलापुरात आगमन होणार आहे. रात्री येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचा मुक्काम राहणार आहे. शुक्रवारी, २६ जानेवारी सकाळी साडेआठ वाजता
पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर, दुपारी १२ वाजता गुरुनानक चौकातील ऑफिसर क्लब येथे स्नेहभोजन घेणार आहेत.
दुपारी ४ वाजता नॉर्थकोट प्रशाला येथे आयोजित शंभराव्या विभागीय नाट्य संमेलनाच्या मुख्य रंगमंच उद्घघाटन सोहळ्याला त्यांची हजेरी लागणार आहे. त्यानंतर, रात्री त्यांचा शासकीय विश्रामगृहात मुक्काम राहणार आहे.
शनिवारी, २७ जानेवारी रोजी सकाळी पावणेसात वाजता शासकीय वाहनाने बलिदान चौकाकडे जाणार आहेत. सात वाजता बलिदान चौक ते नॉर्थकोट प्रशाला परिसरात आयोजित नाट्य दिंडी कार्यक्रमाचे उद्घघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळी साडेदहा वाजता शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १ वाजता शासकीय वाहनाने ते पुण्याकडे रवाना होणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज