चिकलगी येथून अपहरण झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलास शोधण्यात मंगळवेढा पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलीस नाईक सुहास देशमुख यांना या मुलास शोधून काढले असल्याने त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील चिकलगी येथून १६ वर्षीय मुलास कशाचे तरी अमिष दाखवून अपहरण केल्याची घटना घडली होती.याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील फिर्यादी शिवाप्पा हणमंत परिट (रा.चिकलगी) यांच्या १६ वर्षीय मुलास दि.२९ रोजी सकाळी ९ वा. फिर्यादीच्या राहत्या घरापासून अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते.
याबाबत पोलीस नाईक सुहास देशमुख यांनी गावातील पोलिस पाटील अनिल उंबराणी यांच्या मदतीने या मुलास कर्नाटक राज्यातील इंडी येथून पेट्रोप ताब्यात घेऊन त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले आहे.
मामाची आठवण येत आहे म्हणून घरातून कुणालाही न सांगता पायी चालत तो अल्पवयीन मुलगा इंडीच्या दिशेने निघाला होता. पोलीस नाईक सुहास देशमुख यांना गोपनीय खबऱ्याच्या आधारे माहिती मिळाली आणि त्यास ताब्यात घेतले.
उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील,पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पोलीस नाईक सुहास देशमुख यांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज