mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे मंगळवेढ्यासाठी मोठे योगदान; विशाल खंदारे यांचा संपूर्ण लेख वाचा सविस्तर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 18, 2022
in राजकारण, राज्य, सोलापूर
नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

टीम मंगळवेढा टाइम्स ।

दुष्काळी मंगळवेढा तालुक्यासह राज्यात शैक्षणिक, सांस्कृतिक वारसा कायम ठेवण्यामध्ये माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.

घरामध्ये राजकीय वारसा नसताना बुद्धीच्या जोरावर त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरीस सुरुवात केली.

परंतु पंढरपूरच्या शेजारी असलेल्या दुष्काळी मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी असलेला दुष्काळ कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी मोठे कष्ट घेतले.

या भागाला पाणी मिळावे म्हणून उजनी कालवा खोमनाळ परिसरामध्ये शेवट झाला होता. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांमुळे परिसरापर्यंत हुलजंती , कागष्ठ पर्यंत गेला.

या परिसरामध्ये बागायत क्षेत्र वाढ होण्यास मदत झाली. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेत शरद पवार यांच्या साक्षीने म्हैसाळचे पाणी आणण्याचे सुतोवाच केले.

आज तब्बल २१ वर्षांनंतर मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील सहा हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळण्याचा मार्ग सुलभ झाला. उजनी लाभ क्षेत्रात वाढ आणि म्हैसाळचा आजचा पाणी प्रश्न तालुक्यामध्ये मार्गी लावण्यात सुरुवातीच्या काळात सरांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी युती शासनाच्या काळात तालुक्याला पाणी मिळावे व कृष्ण तलाव भरून द्यावा या मागणीसाठी चोखामेळा चौकात उपोषणाचा मार्ग स्वीकारला.

परंतु, काही मंगळवेढेकरांनी प्रती उपोषण करून सरांच्या आंदोलनाची टर उडविण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हाच्या सरांच्याच प्रयत्नाचे पाणी आज मंगळवेढ्याला मिळत आहे. बाकी अजूनही काही भागात पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

तालुक्यातील शैक्षणिक विकासात देखील सरांनी फार मोठे कष्ट घेतले. भाळवणी, येड्राव, खवे, पडोळकरवाडी, शिरनांदगी, पाटकळ, डोणज , मंगळवेढा, नंदूर, सोड्डी या ठिकाणी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा व महाविद्यालय सुरु केल्यामुळे ग्रामीण भागातील मुले शिकू लागली.

त्यामुळे त्यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन बंद पडणारे शिक्षण केवळ सरांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील मुलींना मिळाले. हा प्रयत्न केवळ मंगळवेढा पुरता मर्यादित राहिला नाही तर राज्यभर यामध्ये शैक्षणिक क्रांतीत योगदान दिले.

शाहू शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानाबरोबर वैचारिक ज्ञान मिळावे म्हणून दिवाळीच्या सुट्टीमध्ये वासंतिक वर्ग सुरू करून त्यामध्ये शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षा व त्यांना भौतिक , सामाजिक , राजकीय ज्ञानाची माहिती हवी म्हणून नामांकित वक्ते आणून त्यांना त्याबाबतचे ज्ञान उपलब्ध करून दिले.

मंगळवेढ्यामध्ये कवी संमेलन व धार्मिक कार्यक्रमात बाबा महाराज सातारकर यांचा कार्यक्रम घेऊन तालुक्यात संत परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केला . तालुक्यातील बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काही कॅम्पस मुलाखती संस्थेच्या माध्यमातून घेतल्या.

मंगळवेढ्यात औद्योगिक वसाहत आणण्यासाठी देखील त्यांनी योगदान दिले . नगरपालिकेमध्ये विविध विकास कामांसाठी मंत्रीपदी असताना निधी  उपलब्ध करून दिला व पालकमंत्री झाल्यावर देखील मंगळवेढेकर यांना झुकते माप दिले.

तालुक्याच्या शैक्षणिक , राजकीय विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊन देखील त्यांना राजकारणामध्ये मोठा संघर्ष करावा लागला. त्या राजकीय संघर्षाचे ते बळी ठरले . त्यामुळे त्यांच्या राजकीय करिअरला धक्का पोहोचण्याचा प्रयत्न देखील झाला.

मात्र, त्यांनी आपला ठसा सोडला नाही. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे काम ते करत आहेत. त्यांनी बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर बहुजनांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले.

आज त्यांच्या पश्चात ही जबाबदारी अॅड . कोमल ढोबळे – साळुंखे यांच्या खांद्यावर आहे. त्या देखील ही जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. तर पुत्र अभिजीत ढोबळे हे देखील सूतगिरणीच्या माध्यमातून सरांचा वारसा जोपासण्याचे काम करीत आहेत.

परंतु या सर्वांच्या अशा या दैदीप्यमान राजकीय वाटचालीत वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्या पत्नी सावली फाऊंडेशनच्या आधारस्तंभ अनुराधा ढोबळे या आजमितीला नसणे ही खंत आहे. सरांच्या पुढच्या वाटचालीसाठी दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना – विशाल खंदारे , सोलापूर

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लक्ष्मणराव ढोबळे

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
Next Post
पर्यावरणाचा ऱ्हास! भिमा नदी पात्रातून पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रन् दिवस अवैध वाळू उपसा सुरु; ठेका रद्द करण्याची मागणी

अर्थकारण! मलिद्यासाठी वाळू ठेकेदारांमध्ये चढाओढ; 'या' कंपनीने टेंडर केले परत

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 15, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा