टीम मंगळवेढा टाईम्स ।
सुवर्णरत्न मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सिद्धापूर यांच्या अत्याधुनिक मुख्य कार्यालयाचे उद्घाटन आज गुरुवार दि.१४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष महादेव बिराजदार (गुरुजी) यांनी दिली.
गेल्या १३ वर्षांपासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील हजारो नागरिकांशी विश्वासाचे नाते जपणाऱ्या सुवर्णरत्न मल्टीस्टेट, सिद्धापूरने नागरिकांच्या प्रेम, आशीर्वाद आणि सहभागाच्या बळावर आपली आर्थिक क्षमता प्रचंड वाढवून विश्वासार्ह नाव निर्माण केले आहे.
आज, या यशस्वी प्रवासाला नवा आयाम देत मुख्य कार्यालयातून सेवा आणखी जलद, कार्यक्षम व आधुनिक पद्धतीने देण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.
या भव्य सोहळ्याचे उद्घाटन विधानपरिषद माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत फॅबटेक मल्टीस्टेटचे संस्थापक भाऊसाहेब रुपनर, आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिजामाता पतसंस्थेचे संस्थापक रामकृष्ण नागणे, धाराशिव कारखाना युनिट ४ चे एम.डी. अमर पाटील, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील,
सु.रा. परिचारक मल्टीस्टेटचे संस्थापक प्रकाशतात्या पाटील, जकराया शुगरचे एम.डी. सचिन जाधव, द्राक्ष बागायतदार बाळासाहेब झांबरे पाटील,
ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड.एस.बी.इनामदार, ब्रह्मा उद्योग समूहाचे अध्यक्ष मारुती माळी, एलकेबी मल्टीस्टेटचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले, माणगंगा परिवाराचे संस्थापक नितीन इंगोले, शोभाश्री परिवाराचे संस्थापक किरण पुजारी,
पद्मावती मल्टीस्टेट व्हा. चेअरमन आकाश पुजारी, विठ्ठल मल्टीस्टेटचे संस्थापक दीपक बंदरे, राजलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक लिंगाणा पाटील, चार्टर्ड अकाउंटंट नीलकंठ वाघचवरे, चार्टर्ड अकाउंटंट ऋषिकेश शहा, सहाय्यक निबंधक विजय वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
“गेल्या १३ वर्षांत नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर सुवर्णरत्न मल्टीस्टेट सिद्धापूरने घराघरात अर्थसाहाय्य पोहोचवत गोरगरिबांच्या स्वप्नांना अर्थ दिला आहे. आज नागरिकांची साथ आणि आशीर्वादामुळे आम्ही आर्थिक क्षमतेच्या शिखरावर पोहोचत आहोत.
आता मुख्य कार्यालयातून सेवा आणखी जलद, उत्कृष्ट व आधुनिक पद्धतीने दिली जाईल,” असे अध्यक्ष महादेव बिराजदार (गुरुजी) यांनी सांगितले.
सर्व नागरिकांनी आज उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे व्हा. चेअरमन ॲड. गंगाधर व्हनगोंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत पत्तार व समस्त संचालक मंडळाने केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज