मंगळवेढा टाईम्स न्युज : संपादक – समाधान फुगारे
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या जयघोषात मंगळवेढा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे थाटात लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे.

या ऐतिहासिक क्षणाप्रसंगी समस्त मंगळवेढेकर व शिवप्रेमी यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. पुतळ्याच्या उद्घाटक सोहळ्यास मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती.
याप्रसंगी आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे, भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत, धनश्री परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, शिवशंभो पतसंस्थेच्या चेअरमन तेजस्विनी कदम, प्रियदर्शनी कदम-महाडिक,

युटोपीयन शुगरचे उपाध्यक्ष रोहन परिचारक, समितीचे अध्यक्ष अजित जगताप, डिव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अमर पाटील, भगीरथ भालके, माजी नगराध्यक्षा अरुणा माळी, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण,

प्रा.येताळा भगत, रामभाऊ वाकडे, चंद्रकांत घुले, मुरलीधर दत्तू, विष्णूपंत आवताडे, चंद्रशेखर कोंडूभैरी, संतोष रंधवे, अँड.नंदकुमार पवार,अर्जुन चव्हाण यांच्यासह शेकडो शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.

मंगळवेढा शहरातील नागरिकांनी पुष्पवृष्टी करून शिवरायांच्या पुतळ्याचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. विशेषत: इंग्लिश स्कूल येथील शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषेत मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता.

गेल्या काही दिवसांपासून मंगळवेढा शहरात शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटक सोहळ्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यशस्वी झाल्याने शिवप्रेमी नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

मंगळवेढ्याच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेचा दिवस कायम स्मरणात राहण्यासारखा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी देणारा ठरला.
या सोहळ्यास संपूर्ण मंगळवेढा तालुक्यातील शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित सहभाग नोंदविला होता.
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्या शुभेच्छा
मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी फोन द्वारे समस्त मंगळवेढेकरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









