टीम मंगळवेढा टाईम्स ।
विवाह नोंदणी दाखला देण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेताना ग्रामसेवकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
विठ्ठल पांडुरंग शिंदे गाव बेलाटी तालुका उत्तर सोलापूर असे ग्रामसेवकांचे नाव आहे.
आज गुरुवारी दुपारच्या सुमारास पंचायत समिती उत्तर सोलापूर या कार्यालय परिसरात ही कारवाई झाली. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी विवाह नोंदणी दाखला मिळण्यासाठी ग्रामसेवक विठ्ठल शिंदे यांच्याकडे अर्ज केला होता
दाखला देण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी ग्रामसेवकांनी केली होती ती लाच स्वीकारताना गुरुवारी दुपारी शिंदे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
ग्रामसेवक शिंदे याच्या विरोधात सदर बजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज