मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
गावातील अवैधरीत्या दारू विक्री, जुगार, मटका बंद करावेत, म्हणून ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर केल्याचा राग मनात धरून गावातील अवैद्य व्यवसायिकांनी चक्क पोलिसासमोर सरपंचाला हातपाय तोडून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी, सरपंच अनिल शिवाजी हंबीरराव (रा. वाकी शिवणे, ता. सांगोला) यांनी अजित बुचडे, नीलेश होवाळ, सुनील चव्हाण, सागर हेगडे व सुंदर काटे यांच्या विरुद्ध सांगोला पोलिस ठाण्याला तक्रारी अर्ज दिला आहे.
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावात खुलेआम अवैधरीत्या दारू विक्री, तसेच जुगार मटका व गुटखा व्यवसाय तेजीत चालू आहे. सदर अवैध व्यवसायामुळे गावातील नागरिक, महिला, शाळकरी मुलांना त्रास होत आहे.
याबाबत ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेत सदरची व्यवसाय बंद करावेत, म्हणून ग्रामसभेने व महिला, ज्येष्ठ, नागरिकांनी एकमताने ठराव मंजूर केला होता.
ग्रामसभेच्या ठरावाची कारवाईबाबत निवेदन
सरपंच अनिल हंबीरराव यांनी पोलिस अधीक्षक सोलापूर दारूबंदी अधिकारी सोलापूर उपविभागीय पोलिस अधिकारी मंगळवेढा व पोलिस निरीक्षक सांगोला यांना ग्रामसभेच्या ठरावाची नक्कल जोडून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले आहे.
दखल घेऊन पोलिस कर्मचारी दारू विक्रेत्यावर धाड टाकण्यासाठी गेले असता, चक्क पोलिसांसमोर सरपंच अनिल हंबीरराव यांना हातपाय तोडून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज