मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
अक्कलकोट तालुक्यातील हंद्राळ ग्रामपंचायत सरपंच गंगुबाई तलवार यांच्या विरुद्ध गावातील विजयकुमार काटगाव यांनी सोलापूर येथील जिल्हाधिकारी यांच्याकडे सरपंचांनी निवडणूक जमा खर्च वेळेत जमा केले नाहीत,

तसेच खर्चात तफावत आहे आणि खर्च बँकेमार्फत केले असल्याचे कुठलेही पुरावे सरपंचांनी खर्च जमा करताना दिले नाहीत. म्हणून त्यांना अपात्र करावे अशा आशयाची तक्रार केली होती. त्यावर सुनावणीअंती जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सरपंच गंगुबाई तलवार यांना अपात्र केले होते.

या निर्णयाविरोधात सरपंच गंगुबाई तलवार यांनी अॅड. मंजुनाथ कक्कळमेली यांच्यामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागितली.

निवडणूक आयोगाने सदरचे अपील ग्राह्य धरून जिल्हाधिकारी सोलापूर यांचे तत्कालीन आदेश रद्द केले होते. त्यावर नाराज होऊन सामनेवाला विजयकुमार काटगाव यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

त्यावर सुनावणीदरम्यान सरपंचकडून अॅड. मंजुनाथ कक्कळमेली यांनी मुळात राज्य निवडणूक आयोगाच्या १५ ऑक्टोबर २०१६ रोजीचा परिपत्रक हे फक्त पक्ष चिन्हावर लोकसभा, विधानसभा

तसेच महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात आहे, तसेच सदरचे परिपत्रक ग्रामपंचायत निवडणूक वैयक्तिक पातळीवर तसेच पॅनलवर लढविले जातात.
त्यामुळे ते परिपत्रक हे ग्रामपंचायतीसाठी लागू नाही म्हणून निवडणूक आयोगाने दिलेला आदेश हा योग्य व बरोबर आहे, असे युक्तिवाद केले असता

मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ येथील न्या. चपळगावकर यांनी बँक खात्यामार्फत निवडणूक खर्च बंधनकारक नाही असा निर्वाळा देत सदरची याचिका रद्द केली.

यात सरपंचांकडून अॅड. मंजुनाथा कक्कळमेली, तर याचिकाकर्त्याकडून अॅड-सुहास इनामदार आणि राज्य निवडणूक आयोगाकडून अॅड. सचिंद्र शेट्ये यांनी युक्तिवाद केले.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












