टीम मंगळवेढा टाईम्स ।
महारष्ट्र राज्याच्या ग्राम विकास विभाग अंतर्गत निर्गमित केल्या गेलेल्या दि. २४/०६/२०२४ रोजीच्या शासननिर्णयानुसार राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्व:ताच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा
ग्रामपंचायतींना स्वत्रंत अत्याधुनिक कार्यालयीन इमारत उभारणीसाठी “मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्रीग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत” निधी मंजूर करण्यात आला असल्याने
आता ग्रामपंचायत कार्यालय स्मार्ट होणार असून.
या शासननिर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचयतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत बांधकाम मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
सदरील शासननिर्णया नुसार ग्रीन बल्डिंग संकल्पना आमलात आणून नैसर्गिक प्रकाशयोजना, पर्जन्यजल पून: र्भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक साहित्य तथा साधनसामग्री चा वापर करून सदर पर्यावरणपूरक व स्मार्ट कार्यालयाची उभारणी होणार आहे.
या बाबतची मागणी सोलापूर जिल्ह्यातील भूमिपुत्र नागराज ज्ञानोबा व्हनवटे यांच्या वतीने शिवसेना उपनेते आणि सोलापूर जिल्हयाचे निरीक्षक इरफानभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली
दिनांक ६.०४.२०२४ रोजी निवेदन देऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना करण्यात आली होती. सदर च्या मागणीचा सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला या शासननिर्णयाने यश येऊन
आता ग्रामपंचायत कार्यालये अधिक सक्षमतेने कार्य करून नागरिकांना अधिकाधिक शासनाच्या योजनांचे फायदे पोहचवन्यास सक्षमपणे कार्य करील हि बाब नागराज ज्ञानोबा व्हनवटे यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली
आणि त्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब, ग्रामविकास मंत्री गिरिशजी महाजन साहेब यांचे आभार मानले…!
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज