मंगळवेढा : प्रकाश खंदारे
ज्यांच्या घामातून सिंचन झालेल्या मातीतून आपली भाकरी पिकते त्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीच्या महाप्रलय संकटात शासनाने आधारस्तंभ बनावे अशी मागणी अखिल भारतीय मानव संरक्षण समितीचे सोलापूर जिल्हा निरीक्षक सिद्धेश्वर अवघडे यांनी निवेदनाद्वारे नायब तहसीलदार मंगळवेढा यांना केली आहे.
जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्षरशः कोलमडून पडला आहे अशा परिस्थितीमध्ये संवेदनशील मनाने आणि शेतकऱ्यांप्रती असणाऱ्या कृतज्ञतेच्या भावनेपोटी शासनाने कोणतेही निकष समोर न ठेवता सरसकट शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे.
सदर मागणीचे जिल्हा निरीक्षक अवघडे यांनी समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत नायब तहसीलदार जाधव यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
उभी पिकं पूर्णपणे पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये घरांमध्ये व शेतांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. हा वाहणारा प्रवाह लोकांना धास्तावून टाकणारा आहे. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आयुष्य अक्षरशः उद्धस्त झाले आहे. अशावेळी शासनाने कागदोपत्री निकष बाजूला ठेवून, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू न येऊ
देता सढळ हाताने आणि तातडीने मदत करणे गरजेचे असल्याचे जिल्हा निरीक्षक अवघडे यांनी यावेळी सांगितले आहे.
यावेळी समितीचे तालुकाध्यक्ष प्रकाश खंदारे, शहराध्यक्ष गणेश ओमणे, गजानन बनसोडे, अविनाश गालफाडे, निलेश शिंदे, मेजर भंडारे, अरविंद देवखुळे, शंतनु खिलारे, राहुल भंडारे, भगवान अवघडे, बाबा अवघडे, महादेव अवघडे, रोहन भंडारे, दामाजी अवघडे, सारंग कांबळे तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज