टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे सरपंच रामेश्वर मासाळ यांच्या संकल्पनेतून व जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.
त्यांचे उद्घाटन सरपंच रामेश्वर मासाळ यांच्या हस्ते करण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेरे बसविणारे गोणेवाडी गाव हे मंगळवेढा तालुक्यातील पहिलेच गाव आहे असे मत रामेश्वर मासाळ यांनी व्यक्त केले.
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी उद्योजक सचिन गवळी व पोलीस पाटील संजय मेटकरी यांनी परिश्रम घेतले.
यावेळी सरपंच रामेश्वर मासाळ, उपसरपंच विष्णू मासाळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबासाहेब मासाळ, पोलीस पाटील संजय मेटकरी, ग्रामसेवक करे, तलाठी नळे, अर्जुन मासाळ, भाऊसाहेब कोळेकर, सोसायटीचे चेअरमन बंडू मासाळ,
ग्रा.पं.सदस्य आप्पा मासाळ, तानाजी मासाळ, दिपक गवळी, रामचंद्र हजारे, राहुल व्हरे, अभिमान माने, संजय पाटील, शंकेश्वर मासाळ, नंदू गवळी , अंकुश बंडगर , दादा बंडगर , आण्णा मासाळ,
गणेश गवळी , बापू मासाळ , सुनील मंडले , जयवंत काळे , दयानंद कोळी यांचेसह ग्रामसुरक्षा दलाचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज